मुंबई : महाराष्ट्रसह देशभरात साखर महागली आहे. साखरेचा तुटवडा निर्माण झाल्याने साखर महागली आहे. तसेच देशात सण उत्सवाचा काळ असल्याने साखरेची मागणी अधिक वाढणार आहे. साखरेचा तुटवडा आणि वाढती मागणी या पार्श्वभूमीवर डी-मार्ट सारखे रिटेलर्स आणि बीग बास्केट, ब्लिंकीट तसेच स्वीगी इन्स्टामार्ट सारख्या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मने ग्राहकांच्या साखर खरेदीवर बंदी घालण्यास सुरुवात केली आहे. साखरेच्या कमतरतेमुळे गेल्या दोन महिन्यात साखरेच्या रिटेल किंमतीमध्ये ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. काही रिटेलर्सनी केवळ ३ ते ५ किलो साखर देण्यास सुरुवात केली आहे. त्यापेक्षा अधिक साखर खरेदी करण्यास बंदी घातली आहे. पॅकेज्ड फूड बनविणार्या कंपन्यांना केवळ साखरच नव्हे तर गोडातेलासाठीही अधिक किंमत मोजावी लागत असतानाच कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऐन सणासुदीत ग्राहकांना मात्र, साखरेची टंचाई भासणार आहे.
साधारणपणे सणासुदीच्या काळात तेलाची मागणी अधिक वाढते. मॅन्यूफॅक्चरर्स किंमती कमीत कमी पाच ते सहा टक्क्याने वाढवण्याची तयारी करत आहेत. साखरेच्या किंमती अधिक वाढल्या तर तेलाच्या किंमतीतही अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. आमच्याकडे किंमती सुमारे ५ टक्क्यांनी वाढवण्यापलिकडे काही मार्गच नाहीये, असं देशातील प्रमुख स्नॅक्स फूड बनवणारी कंपनीच्या प्रमुखाने स्पष्ट केलंय.
रेशनिंग करण्याची प्रक्रिया
भारताने किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी गेल्या आठवड्यात १० लाख टन साखर आयात करण्यास मंजुरी दिली होती. ईटीच्या रिपोर्टनुसार, अनेक रिटेल आणि ई-कॉमर्स कंपन्यांच्या स्टॉकला १ किलोचे दोन ते तीन पॅक वा ५ किलोचा एक पॅकपर्यंत मर्यादित करत आहे. म्हणजे या कंपन्या ग्राहकाला केवळ पाच किलोच साखर देणार आहे. त्यावर साखर देणार नाही.