अयोध्या : राम मंदिरातील दान मोजणी व्यवस्थेत सुरक्षा आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी एक मोठा बदल करण्यात आला आहे. मोजणी कक्षात आता कर्मचार्यांना कडक सुरक्षा व्यवस्था आणि डबल चेकिंग केल्यानंतरच प्रवेश दिला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोजणी करणार्या कर्मचार्यांसाठी आता नवा ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे.
कर्मचार्यांना नो पॉकेट असलेला डार्क ब्लू रंगाचा पोशाख घालणं बंधनकारक असेल. यासोबतच मोजणी कक्षात प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येक कर्मचार्याला दोन टप्प्यांच्या सुरक्षा तपासणीला सामोरं जावं लागेल. दानाची मोजणी आता खुर्ची-टेबलावर नव्हे, तर जमिनीवर बसून केली जाईल. मोबाईल, कॅमेरा, बॅग आणि इतर वैयक्तिक सामान मोजणी कक्षाच्या आत घेऊन जाण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
कर्मचार्यांना मोजणी कक्षात प्रवेश करण्यापूर्वी आपल्या चपला बाहेरच काढाव्या लागतील. याच दरम्यान राम मंदिरातील दान चोरीचं प्रकरण सातत्याने नवीन खुलाशांमुळे चर्चेत आहे. या प्रकरणातील आरोपी अनुकल्प मिश्रा याच्याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनुकल्प मिश्राच्या नावावर मंदिरात व्यवस्था कार्यकर्ता म्हणून एंट्री पास जारी केला जात असे.
मंदिरात होणार्या प्रत्येक विशेष कार्यक्रमादरम्यान अनुकल्प मिश्राच्या नावाने एंट्री पास तयार केला जात होता, असा आरोप आहे. याच व्यवस्था कार्यकर्ता पासच्या माध्यमातून त्याला मंदिर परिसरात प्रवेश मिळत असल्याचा दावा केला जात आहे. याच पासच्या आधारे तो दानाच्या रकमेच्या मोजणी प्रक्रियेत सामील होत होता, असाही आरोप आहे.
दुसरीकडे, दान चोरीच्या प्रकरणात श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य महंत दिनेंद्र दास महाराज यांनी दोषींसाठी कठोर शिक्षेची मागणी केली आहे. देवाच्या घरात गुन्हेगारी करणार्यांना थेट फासावर लटकवलं पाहिजे असं म्हटलं आहे. अयोध्या येथील राम मंदिराच्या दान चोरीच्या प्रकरणात नवनवीन खुलासा करत आहे.
महाकुंभादरम्यान झाला संघटित अपहार
अयोध्येतील राम मंदिरातील देणगी अपहार प्रकरणी तपासातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुरुवातीला किरकोळ चोर्यांकडे दुर्लक्ष केलं गेलं होतं, मात्र गेल्या वर्षी महाकुंभादरम्यान जेव्हा भाविकांची गर्दी आणि दान प्रचंड वाढलं, तेव्हा हा अपहार अधिक संघटित पद्धतीने सुरू झाला. याच काळात पैसे मोजण्याच्या प्रक्रियेत अतिरिक्त लोकांचा समावेश करण्यात आला होता, अशी माहिती मंदिर प्रशासन आणि पोलिसांमधील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहमीच्या दिवसांत मंदिरातील भाविकांची सरासरी संख्या ८४ हजार ते १ लाख दरम्यान असते. मात्र, १३ जानेवारी २०२५ रोजी सुरू होऊन २६ फेब्रुवारी २०२५ दरम्यान झालेल्या ४५ दिवसांच्या महाकुंभ उत्सवावेळी, १० ते १२ लाख भाविक दिवसाला दर्शन घेत होते. स्टेट बँक ऑफ इंडियाला मदत करण्यासाठी श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या सदस्यांच्या शिफारशीवरून पैसे मोजण्याच्या कामात अतिरिक्त कर्मचारी वाढवण्यात आले होते, असंही सूत्रांनी सांगितलं.
याआधीही अनेकवेळा अपहार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भरती प्रक्रिया आणि पैशांच्या कथित अपहारावरून ट्रस्टशी संबंधित दोन सदस्यांमधील अंतर्गत वादामुळे हे प्रकरण जाहीर झालं. एका पोलीस अधिकार्याने ङ्गद इंडियन एक्सप्रेसफला सांगितलं, ङ्गङ्घहा अपहार मंदिर प्रशासनाच्या निदर्शनास येण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. याकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केलं गेलं होतं; मात्र अलीकडेच लागोपाठ घडलेल्या काही घटनांमुळे हे प्रकरण एकामागून एक उघडकीस आले.
सूत्रांनी सांगितलं की, सुरुवातीला संशयितांना चोरीचे पैसे पुन्हा खात्यात जमा करण्यास सांगून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तसंच, तेथे दोन सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष होते. त्यातील एक पोलिसांच्या देखरेखीखाली होता, तर दुसरा पैसे मोजण्याच्या केंद्रावर होता, जिथे ट्रस्टचे अधिकारी आणि पोलीस तैनात होते. तपास अधिकारी आता पोलीस आणि एसबीआय अधिकार्यांच्या भूमिकेचीही चौकशी करत आहेत. असा संघटित अपहार केवळ एका पातळीवर शक्य नाही, असं अधिकार्यांचं मत आहे.
अधिकार्यांनी सांगितलं की, मंदिरात मोठा सुरक्षा बंदोबस्त होता. पीएसीच्या ८ कंपन्या, ५०० सीआरपीएफ जवान, उत्तर प्रदेश पोलीस विशेष सुरक्षा दलाचे ७५० जवान आणि नागरी पोलीस तैनात होते. याशिवाय, ट्रस्टने खाजगी सुरक्षा रक्षकही नेमले होते, जे पैसे मोजण्याच्या खोलीबाहेर तैनात होते. एका अधिकार्यानं सांगितलं, ङ्गङ्घखोलीत हाताळल्या जाणार्या रोख रकमेचे अफाट प्रमाण पाहता, सुरक्षा तपासणी नक्कीच अपुरी होती.फफ
पोलिसांनी यापूर्वी सांगितलं होते की, अटक करण्यात आलेल्या आठपैकी सात आरोपींकडून सुमारे ८० लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. तसेच वेगवेगळ्या मूल्यांचे परदेशी चलनही जप्त करण्यात आले आहे. सूत्रांनुसार, २५ जून रोजी एफआयआर दाखल झाल्यापासून मंदिरातील भाविकांच्या संख्येत फारसा बदल झालेला नाही. अधिकृत आकडेवारीनुसार, २७ जून रोजी अंदाजे ९७ हजार १३४, २८ जून रोजी १ लाख ०२ हजार ६७२ आणि २९ जून रोजी ८४ हजार १०२ भाविकांनी भेट दिली. यानंतर ३० जून रोजी ९६ हजार ११२ आणि १ जुलै रोजी ही संख्या ८९ हजार ६५३ होती.