माळीवाडा प्रकल्पाचा सुवर्ण महोत्सव उत्साहात

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो): माळीवाडा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी उभारण्यात आलेल्या ऐतिहासिक प्रकल्पांना ५० वर्षे पूर्ण झाल्याने यंदा माळीवाडा प्रकल्प सुवर्णमहोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येत आहे.

१९७५ साली सुरू झालेल्या या प्रकल्पामुळे गावाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि मूलभूत विकासाला नवे वळण मिळाले होते. त्या सुवर्णक्षणांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि प्रकल्पात योगदान दिलेल्या मान्यवरांचा गौरव करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे सोमवार, १ रोजी आयोजन करण्यात आले होते. 

या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमानिमित्त प्रकल्पाशी संबंधित अनेक मान्यवरांचे गावात आगमन झाले असताना जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम वाजून स्वागत केले. माळीवाहा ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करून बेरुळ येथील लेण्यांचे व दौलताबाद किल्याचे छायाचित्र असलेल्या भेटवस्तू त्यांना देण्यात आल्या. त्यांच्या बतीने त्यांच्याकडे असलेली त्यावेळेची गावातील काही छायाचित्रे ग्रामपंचायतला भेट देण्यात आली. 

पुरणपोळीचे जेवण गावकर्याच्या वतीने देण्यात आले. १९७५ मध्ये पहिल्या बंधद्वारे प्रशिक्षणाची सुरुवात झाली. १९७६ साली तत्कालीन राष्ट्रपती डॉ. नीलम संजीव रेड्डी यांनी भेट दिल त्या काळात गावात वीज, शौचालये, आरोग्य सुविधा यांसारख्या मूलभूत गोष्टींचा अभाव होता, महिलांना शौचासाठी बाहेर जावे लागे, सर्पदंशामुळे मृत्यू होत असत, अशा परिस्थितीत ग्रामस्थांनी एकत्र येत निधी उभारला. धोखाबावा साठे यांनी धोतर अंथरून लोकांकडून देणग्या गोळा केल्या आणि अवध्या
पाच दिवसांत विजेसाठी निधी जमा करण्यात आला. २६ जानेवारी १९७५ रोजी माळीवाडा गावात प्रथमच वीजप्रवाह सुरू झाला, 

हा गावाच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ठरला, ग्रामीण विकासाचे आदर्श मॉडेल १९७६ पासून मानवी विकास व ग्रामीण विकासाच्या विविध योजना राबविण्यात आल्या, एसबीआय बैंक, पोस्ट ऑफिस सुगडी फैक्टरी, लाकडी आरा मशीन, शेती, शिक्षण, रोजगार, आरोग्य, प्रशिक्षग या क्षेत्रांत मोठी प्रगती झाली. सेवाग्राम, वर्षा येथील संकल्पनांवर आधारित ग्रामीण विकास उपक्रम येथे राबविण्यात आले. 

या प्रकल्पांतर्गत सुमारे ४५० जणानी विविध प्रकारचे प्रशिक्षण घेतले. देश-विदेशातील सहभाग या प्रकल्पामुळे माळीवाडा गावाची ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण झाली. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड येथील प्रतिनिधींनीही भेट देऊन प्रकल्पाचा अभ्यास केला, मुंबई, पनवेल आदी ठिकाणच्या शाळांशीही या उपक्रमांचे संबंध होत. देवगिरी किल्ला, वेरूळ लेण्यांच्या ऐतिहासिक परिसरातील माळीवाडा गावाने ग्रामीण विकासाचे आदर्श उदाहरण उभे केले असून, या सुवर्णमहोत्सवानिमित्त गावाच्या ५० वर्षांच्या विकास प्रवासाची उज्वल परंपरा नव्या पिढीसमोर मांडली गेली. 

यावेळी सरपंच ज्योती मुळे, उपसरपंच मनीष गाजरे, सदस्य कृष्णा मुळे, प्रवीण बर्डे, पोलीसपाटील प्रमोद साठे, मुख्याध्यापक अनंता गोरे, एफ. एन, तडवी, ग्रामविकास अधिकारी जी.डी. चव्हाण, राम उदावंत, अॅड. नद‌किशोर बंगारे, नंदकिशोर मुळे, गणेश आस्वार, डॉ. वैजिनाथ आढाव, राम उदावंत व ग्रामस्थांनी नियोजनात मोलाची भूमिका बजावली.