सांजवार्ता
Page No.: 3 Date: 22/11/2026
खासगी व्हिडिओंचा धाक दाखवून ६७ लाखांची वसुली
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : अनेक तरुणींचे लैंगिक शोषण आणि लाखो रुपयांची फसवणूक करून दुबईला पसार झालेल्या आरोपी मोहम्मद माजिन अब्दुल रशीद शेख याला पोलिसांनी अटक करून शनिवारी शहरात आणले. मैत्री करून विश्वास संपादन करणे आणि खासगी व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. सीबीआय आणि इंटरपोलच्या मदतीने दुबई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर शुक्रवारी कोचीमार्गे भारतात आणण्यात आले.
याप्रकरणी एका २८ वर्षीय तरुणीने १ डिसेंबर २०२५ रोजी सिटी चौक पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. विमानतळावर एकत्र काम करताना ३२ वर्षीय माजिनशी तिची ओळख झाली. चांगले इंग्रजी आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा वापर करून तो तरुणींशी जवळीक साधत असे. जून २०२० मध्ये लग्नाचे आमिष दाखवून व कुटुंबाशी भेट घडवून त्याने विविध हॉटेल्समध्ये तरुणीचे शोषण केले आणि वेगवेगळी कारणे सांगत लाखो रुपये उकळले. २०२२ मध्ये माजिन विवाहित असल्याचे उघड झाल्यावर त्याने तरुणीला मारहाण केली व खासगी व्हिडिओ
सीबीआय, इंटरपोलच्या मदतीने घेतले ताब्यात
मोबाईलचा डाटा केला डिलेट
पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या पाठपुराव्यानंतर सीबीआयने रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. १८ नोव्हेंबर रोजी विशेष पथकाने दुबईत जाऊन त्याचा ताबा घेतला. आरोपीने मोबाईलमधील डेटा डिलीट केल्याने डिजिटल पुरावे गोळा करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. न्यायालयाने माजिनला १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, अन्य पीडितांनी न घाबरता पुढे यावे, असे आवाहन सहाय्यक पोलिस आयुक्त सागर देशमुख यांनी केले आहे.
व्हायरल करण्याची धमकी देत आणखी पैसे लुबाडून पळ काढला.
६७ लाखांची वसुली
'मास्टर ऑफ प्रोग्राम मॅनेजमेंट'चे शिक्षण घेतलेल्या माजिनने छत्रपती संभाजीनगर व पुणे विमानतळावर खासगी सुरक्षा प्रमुख म्हणून काम केले आहे. तपासात त्याने
एकूण १४ तरुणींचे शोषण करून ६७ लाख रुपये (मुख्य तक्रारदाराकडून १८ लाख आणि इतरांकडून ४९ लाख) उकळल्याचे समोर आले आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच तो दुबईला पळून गेला होता. खासगी क्लिप्स आंतरराष्ट्रीय वेबसाइट्सवर अपलोड केल्याचाही पोलिसांना संशय आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions













