धावत्या रेल्वेत दागिने लुटणारा अटकेत

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : नांदेडहून हडपसरकडे प्रवास करणार्‍या ६८ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण धावत्या नांदेड-पुणे एक्स्प्रेसमधून हिसकावणार्‍या अट्टल गुन्हेगारास लोहमार्ग स्थानिक गुन्हे शाखेने मालधक्का परिसरात बेड्या ठोकल्या. आर्यन हरी जाधव (३२, रा. राजनगर, रेल्वे स्टेशन परिसर) असे त्याचे नाव असून, त्याच्याकडून सुमारे ३ लाख रुपयांचे सोन्याचे गंठण जप्त करण्यात आले आहे.
वैजयंतीमाला सीतावार (६८, रा. पूर्णा) या दि. ३ रोजी कुटुंबासह नांदेडहून हडपसरकडे प्रवास करत होत्या. नांदेड-पुणे एक्स्प्रेसच्या एस-५ कोचमधून एका चोरट्याने खिडकीतून त्यांच्या गळ्यातील सुमारे ४३ हजार ७०० रुपये किमतीचे सोन्याचे गंठण तोडून पळ काढला. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.