मनोज जरांगे मुंबईला जाणार, आंदोलनाचा दौरा घोषित.... २० तारखेला आझाद मैदानात , सरकारची धावाधाव, आंदोलनापूर्वी मोठी खलबते...

Foto
मुंबई : आमरण उपोषणाच्या १५ दिवसानंतर आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मागण्यांर्च्ीया पूर्ततेसाठी २० सप्टेबरला मुंबईच्या आझाद मैदानात पोहोचण्याची घोषणा केली. दरम्यान मुंबईच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची भूमिका घेतल्याने सरकारची धावाधाव सुरू झाली आहे. 

जरांगे पाटील आंतरवाली सराटीत बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, माझ्या उपोषणाचा आज १५ वा दिवस आहे. मी आज तुमच्याशी बोलू शकतोय ते सलायनमुळे. आज आपण समाजासाठी जीव जाळतोय. आपल्या विरोधात जळणारी प्रवृत्ती डोळ्यासमोर ठेवा असं मनोज जरांगे पाटील उपस्थितांसमोर बोलताना म्हणाले. ही अंतिम निर्णयाची शेवटची लढाई आहे. शेवटची आहे म्हटल्यावर काय करायचे हे माहित असले पाहिजे असे जरांगे पाटील बोलले. मुंबईला जायचे की अंतरवलीत आंदोलन करायचे? असे त्यांनी समोरच्या गर्दीला विचारले. त्यावर समोरच्या बाजूने मुंबई-मुंबई अशा घोषणा सुरु होत्या. मुंबईला जाण्यासाठी एकमत आहे का? यावर समोरच गर्दी मुंबई, मुंबई ओरडत होती. ‘ठीक आहे मग मुंबईला जायचे फायनल’ असे जरांगे पाटील म्हणाले.

ठीक आहे मुंबईच फायनल आपण ज्या मार्गावरुन जाणार आहोत तो मार्ग सांगतोय. तुम्हाला  सांगतोय विषयाकडे पुन्हा लक्ष ठेवा. आपल्याला समाजाच्या लेकरांना मोठं करायचं आहे. भावना आणि माझ्या समाजाची कदर करायला शिका. समाज हा सगळ्यांचा बाप असतो. मराठ्यांनी पायखाली तुडवले तरी चेंगरुन जातील. त्यामुळे जो मार्ग असेल तो असेल. बर्‍याच लोकांचं म्हणणं होतं की, तुम्ही प्रत्येकवेळी मुंबईला गेलात, या मार्गे गेलात, त्या मार्गे गेलात. पुणेवाल्यांचं म्हणणं होतं की, दोन जाताना तुम्ही एकदा चाकण मार्गे, दुसर्‍यांदा शिवाजीनगर मार्गे गेलात. पश्चिम महाराष्ट्रातून पुन्हा फोन आले. आम्ही कुठे कमी पडतोय का?. भावना समजून घ्या. अर्धा पश्चिम महाराष्ट्र घेतला असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

आपण कुठनही गेलो तरी मुंबईत जायचं आहे आणि जिंकून यायचं आहे. आपण आज जरी  मुंबईला पोहोचायच म्हटलं तरी पोहोचू शकतो का?. कारण गाड्या लाखात आहेत आणि त्या पळतात २०-३० च्या स्पीडने. मुंबईला जायला निघालो की इतके मराठे येतील. गर्दी माझ्या समाजाचं बळ आहे. माझा समाज बलशाली आहे. म्हणून ती गर्दी होती. आपल्याला मुक्काम टाकत, टाकत जावं लागतं. एकदिवसात कुणीबी मराठ्यांना मुंबईत नेऊन दाखवा असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मुंबईत जायचं आणि जिंकून यायचं