गंगापूर, (प्रतिनिधी): मनोज गोवधीन लाहोटी (वय ३६) या युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास उघडकीस आली. उपचारासाठी नेले डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेनंतर परिसरातील
तात्काळ नागरिकांनी मनोज लाहोटी यांना गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. घरात आई नसताना घडली. घटना मिळालेल्या
आली आहे.
माहितीनुसार, घटनेच्या वेळी मनोजची आई काही सामान घेण्यासाठी किराणा दुकानावर गेली होती. घरात कोणी नसताना मनोजने टोकाचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली. गंगापूर परिवारात आणि शहरात शोककळा पसरली आहे. मनोज लाहोटी यांच्या पश्चात आई- वडील आणि भाऊ असा परिवार आहे. गंगापूर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून पुढील तपास पोलीस करत आहे.