पैठण (प्रतिनिधी): मानसी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित छत्रपती संभाजीनगर या संस्थेची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी २१ जून रोजी आशीर्वाद मंगल कार्यालय पैठण येथे संस्थेच्या चेअरमन संगीता देवेंद्र इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात झाली.
त्रेपन्न कोटींचा एकत्रित व्यवसाय असलेली, अठ्ठावीस कोटी ठेवी, नऊ कोटी गुंतवणूक, साडेतीन कोटी स्वनिधी, छत्रपती संभाजीनगर कार्यक्षेत्र असलेल्या संस्थेला २०२५ २६ या आर्थिक वर्षात ४२ लाख रुपये नफा झाला आहे. अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने मानसी महिला पतसंस्था सन्मानीत झाल्याचे चेअरमन संगीता इनामदार यांनी याप्रसंगी सांगितले.
सभेत इतर ठरावांसोबत सभासदांना नऊ टक्के लाभांश देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर झाला. याप्रसंगी सभासदांच्या गुणवंत पाल्यांचे भेटवस्तू देऊन कौतुक करण्यात आले, तसेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या सभासदांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी संस्थेच्या उपाध्यक्ष अश्विनी मडके संचालिका शिला तांबे, रजनी शेवतेकर, सुनीता देवकर, प्रणिता मुळे, राधिका कुलकर्णी, अर्चना गिरवलकर, आरती कावसानकर, पार्वती दारुणकर, दक्षा श्रॉफ, रश्मी कडेठाणकर, साक्षी बेतवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविक संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवेश इनामदार यांनी केले. सहकार गीताचे गायन नेहा पैठणकर यांनी केले. संजय उपाध्ये यांनी आभार मानले. सभेच्या यशस्वीतेसाठी कृष्णनाथ मुळे, विजय औटे, पल्लवी व्यास, राहुल राजे भोसले, श्रीकांत पातकळ, महेश भुसारे, सुनील चन्ने, सुशील कुलकर्णी, अनिल तोतला, सुधीर अपरंपार, सचिन पोटे यांनी परिश्रम घेतले. आभार संजय उपाध्ये यांनी मानले.