सिल्लोड शहरातील ४२ हजारांहून अधिक मतदारांचे मॅपिंग प्रलंबित

Foto
: सिल्लोड, (प्रतिनिधी) : सिल्लोड शहरात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणावर मतदारांचे मॅपिंग अद्याप प्रलंबित असल्याने हे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी भाजप सिल्लोड शहर मंडळाचे अध्यक्ष मनोज मोरेल्लू यांनी जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, सिल्लोड शहरातील एकूण मतदारसंख्या ५५,६३१ असून त्यापैकी ३५,१४० फॉर्मचे वाटप करण्यात आले आहे. १३,२४० फॉर्म ऑनलाइन जमा झाले असले तरी प्रत्यक्षात केवळ १३,२४७ मतदारांचेच मॅपिंग
तातडीने पूर्ण करण्याची मनोज मोरेल्लू यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी पूर्ण झाले आहे. 

त्यामुळे तब्बल ४२,३८४ मतदारांचे मॅपिंग अद्याप प्रलंबित असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. हे काम वेळेत पूर्ण न झाल्यास अनेक पात्र नागरिकांची नावे मतदार यादीतून वगळली जाण्याची किंवा त्यांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. तसेच काही ठिकाणी खोटी अथवा बनावट
कागदपत्रांच्या आधारे मॅपिंग होत असल्याच्या तक्रारींचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

मनोज मोरेल्लू यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सर्व प्रलंबित मॅपिंग तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देणे, सर्व यांना निश्चित श्चत कालमर्यादा देऊन १०० टक्के काम पूर्ण करण्याच्या सूचना देणे, कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व भारत निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार राबविण्याची मागणी केली आहे. या निवेदनाची गंभीर दखल घेऊन आवश्यक ती तातडीची कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.