मराठा आरक्षणाविरोधात याचिका करणारे गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला, हल्लेखोर जालन्याचा तरुण

Foto

मुंबई - मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर कोर्टाच्या आवारात हल्ला झाला आहे. हल्लेखोर मराठा तरुण असल्याचे हल्लेखोराने स्वतः सांगितले. हल्लेखोर तरुणाचे नाव वैद्यनाथ पाटील असून तो जालना जिल्ह्यातील आहे. 

मराठा आरक्षणाविरोधातील याचिकेवर सोमवारी (ता. १०) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होती. अॅड. गुणरत्न सदावर्ते हे कोर्टाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलत असताना एका व्यक्तीने 'एक मराठा लाख मराठा' अशी घोषणा देत  अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला केला. त्यांना मारण्याचा या व्यक्तीने प्रयत्न केला. परंतू सदावर्ते यांच्या सहकारी वकीलांनी या तरुणाला वेळीच बाजूला केले यामुळे सदावर्ते यांना जास्त इजा पोहोचली नाही. तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याचे नाव वैद्यनाथ पाटील असून तो जालन्याचा रहिवासी असल्याचे त्याने स्वतःच सांगितले आहे.