सिल्लोड, (प्रतिनिधी) : ज्ञान विकास विद्यालय कुसुमाग्रज, विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी ग्रंथदिंडी, कविता वाचन, गीत गायन, कुसुमाग्रजांचे साहित्य वाचन, निबंध लेखन पाठावर आधारित नाटिका आदी उपक्रमाने भाषेचा गौरव करण्यात आला.
स्पर्धेत सहभागी व यशवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शालेय वाहनाचे चालक मालक, पालक हजर होते.













