आयकॉनमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

Foto
पैठण, (प्रतिनिधी): विशाल बहुउद्देशीय उद्देशीय प्रतिष्ठान संचलित आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल पैठण मध्ये १७सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 

यावेळी मराठवाडा साहित्य परिषदेचे संचालक, विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. संतोष पाटील तांबे, प्राचार्य आर.बी. रामावत, स्कूल कॉर्डिनेटर शैजू डॅनियल, लीड कॉर्डिनेटर एम. के. कोळगे यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी १७ सप्टेंबर मराठा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त घेण्यात आलेल्या स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशन या स्पर्धेतील १ ते ५ गटात प्रथम क्रमांक मिळवणारे स्वरा चौधरी, ६ ते ८, जोया सय्यद, ९ वी ते १० वी कार्तिकी खराद या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्याच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. 

तसेच भक्ती ठेनगे, साक्षी जानकर, आराध्या दसपुते, कृष्णा खराद, निहित डोईफोडे, या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहण्याच्या हस्ते बेस्ट स्टोरी टेलर म्हणून मान्यवराच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. संतोष पाटील तांबे यांनी विद्यार्थ्यांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मार्गदर्शन करताना स्वामी रामानंद तीर्थ यांचे योगदान व मराठवाडा मुक्ती संग्रामाची माहिती विद्यार्थ्यांना दिली.

गीतांजली येळेने मराठवाडा मुक्ती संग्राम दिनावर गीत गायले. दिपाली सव्वाशे, सार्थक कबाडी, सार्थक खामकर या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वरी खंडागळे व शिवांजली धोकटे या विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमाचे आभार डॉ. जे. ई येवले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकाऱ्यांनी प्रयत्न केले.