मराठवाड्यावर भीषण पाणी टंचाईचे सावट धरणांमध्ये २७ टक्के पाणीसाठा; २४४ गावांना ४१३ टँकर्सचा आधार

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो):
मान्सूनचे आगमन लांबल्यामुळे मराठवाड्यावर पाणीटंचाईचे भीषण संकट ओढावले असून, विभागातील लहान-मोठ्या धरणांमध्ये आता केवळ २७ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. शासनाने जायकवाडी आणि मांजरा या मोठ्या धरणांमधील पाणी केवळ पिण्यासाठी आरक्षित केले आहे. दुसरीकडे ग्रामीण भागाची पाण्यासाठी होणारी वणवण थांबवण्यासाठी प्रशासनाकडून २४४ गावे आणि २६ वाड्यांना तब्बल ४१३ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
सध्या या धरणांमध्ये एकूण ३७९० दलघमी म्हणजे केवळ २७ टक्के इतकाच साठा उरला आहे. त्यात यंदा जून महिना अर्धा संपला तरी मान्सूनचे आगमन झालेले नाही. त्यामुळे एप्रिलपासून सुरू असलेली पाणीटंचाई तीव्र झाली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात
छत्रपती संभाजीनगरसह विभागातील चार जिल्ह्यांत २२ गावे आणि ३६ वाड्यांना १५६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. आजघडीला विभागातील २४४ गावांसह २६ वाड्यांना २१ शासकीय आणि ३२२ खासगी अशा एकूण ४१३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मान्सूनचे आगमन आणखी लांबल्यास भविष्यात पाण्याची भीषण टंचाई जाणवू शकते. त्यामुळे खबरदारी म्हणून राज्य सरकारने
उद्योगाची पाणी कपात नाही
टंचाईस्थिती विचारात घेऊन धरणांमधील पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. १२ जून रोजी जायकवाडीतून सुरू असलेले आवर्तन बंद करण्याबाबत पत्र आलेले आहे. त्यानुसार कार्यवाही झालेली आहे. उद्योगांच्या पाणी कपातीची सध्या आवश्यकता नाही. भविष्यात परिस्थिती गंभीर झाली तर त्या परिस्थितीचा विचार करून निर्णय घेतला जाईल.
विनय गौडा जी. सी., प्रभारी विभागीय आयुक्त
मराठवाड्यातील जायकवाडी, मांजरासह सर्व धरणांमधील पाणीसाठा केवळ पिण्यासाठी आरक्षित केला आहे. या धरणांमधून शेतीची पाण्याची आवर्तने बंद करण्यात आली आहेत.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions