छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित शासकीय कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामात प्राणांची आहुती दिलेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर केलेल्या भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा विकासासंदर्भात राज्य सरकारतर्फे राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच, मराठवाड्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचाही देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणात उल्लेख केला.
यावेळी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास संक्षेपात सांगितला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मराठवाडा स्वातंत्र्यासाठी झगडत होता. १३ महिन्यांनंतर मराठवाड्याला मुक्ती मिळाली. या लढ्यात ज्या ज्या स्वातंत्र्यसेनानींनी आपलं बलिदान दिलं, कारागृहात अत्याचार सहन केले, सत्याग्रहाच्या माध्यमातून आंदोलनं केली, अशा सर्व स्वातंत्र्यसंग्राम सेनानींना मानाचा मुजरा करतो. जे आमच्यामध्ये नाहीत, त्या सर्वांना आदरांजली अर्पण करतो. त्यांच्या बलिदानामुळेच खर्या अर्थानं मराठवाडा मुक्त झाला आहे. तेव्हाचे आपले लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी मोठी लढाई उभी केली आणि चारही बाजूंनी दबाव तयार केला आणि त्यातून मराठवाडा मुक्त झालाफफ, असं ते म्हणाले.
वंदे मातरम् उच्चारण्यावरही बंदी होती देवेंद्र फडणवीस
आज आपण वंदे मातरमची १५०वी शताब्दी साजरी करतोय. पण वंदे मातरम शब्द उच्चारण्यावरही त्या काळात बंदी होती. मराठी बोलण्यावर बंदी होती. मराठी शिकवायला बंदी होती. अत्याचाराची परिसीमा पाहायला मिळाली. सण-उत्सव साजरे करता येत नव्हते. अशा अवस्थेतून मराठवाड्याला बाहेर काढण्याचं काम स्वातंत्र्यसेनानींनी केलं, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
सरकार दुष्काळग्रस्त शेतकर्यांना वार्यावर सोडणार नाही
दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठवाड्यातील दुष्काळाचा उल्लेख करतानाच शेतकर्यांना आश्वासित केलं. ङ्गङ्घमराठवाडा सातत्याने संघर्ष करतोय. विकासाचा मोठा संघर्ष मराठवाड्यात चालला आहे. सर्वात जास्त दुष्काळाचं संकट मराठवाड्यावर घोंघावताना दिसतं. हे वर्षदेखील दुष्काळाचं वर्ष आहे. असं वाटत होतं की यावेळी पीक चांगलं असेल. पण पावसाचा मोठा खंड पडला आणि शेतपिकांचं मोठं नुकसान झालं. मी त्या शेतकर्यांना आश्वासित करू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीत आपलं सरकार तुम्हाला वार्यावर सोडणार नाही. सरकार शेतकर्यांच्या पाठिशी उभं राहील. सर्व प्रकारची मदत शेतकर्यांना दिली जाईलफफ, असं ते म्हणाले.
५ ऑक्टोबरनंतर लगेच पंचनामे पूर्ण करून शेतकर्यांना आम्ही मदत करणार आहोत. एनडीआरएफची मदत मिळेलच. पण त्याआधीच राज्य सरकार आपली मदत शेतकर्यांपर्यंत पोहोचवणार आहे. पिण्याच्या पाण्याच, चार्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आधीच वैरण विकास कार्यक्रमांतर्गत चार्याची लागवड केली होतीफफ, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी भाषणात सांगितलं.
मुक्ती मिळाली; पण खरंच मराठवाडा मुक्त झाला का?
४८ हजार कोटींची वीजबिलं रद्द मुख्यमंत्र्यांची घोषणा
दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकर्यांची थकित ४८ हजार कोटींची वीजबिलं रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली. ङ्गङ्घशेतकर्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आपण केलाय. पण आता त्यांची जुनी ४८ हजार कोटींची बिलं रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे शेतकर्यांची कुठलीही अडचण होणार नाहीफफ, अशी माहिती त्यांनी दिली.
मराठवाडा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त होणार?
मराठवाड्यातील दुष्काळावर उपाययोजना करत असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. ङ्गङ्घउल्हास खोर्यातून ७० टीएमसी पाणी गोदावरी खोर्यात आणण्याचं काम चालू आहे. या पिढीनं दुष्काळ पाहिला आहे, पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही. एकूण ७ वर्षांत टप्प्याटप्प्यानं हे पाणी गोदावरी खोर्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करू. त्यातून मराठवाड्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न आपण करूफफ, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.