मराठवाड्याला नाशिकचे पाणी नाही

Foto
सागर प्रकाशनचे
साजवार्ता
Page No.: 6 Date: 01/11/2026

जायकवाडीत ८० टक्के जलसाठा : जलसंपदामंत्री विखे पाटील यांची माहिती
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) :
यावर्षी नाशिकच्या धरणांमधून मराठवाड्यासाठी पाणी सोडले जाणार नाही, असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. जायकवाडी धरणात सध्या ८० टक्क्यांहून अधिक जलसाठा उपलब्ध असल्याने पाणी सोडण्याची गरज भासणार नाही, अशी माहिती त्यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
प्रौढ प्रताप पुरंदर या महानाट्याला उपस्थित राहण्यासाठी आले असता त्यांनी शेतकरी आंदोलन, नांदूर मधमेश्वर कालवा आणि जायकवाडीतील समन्यायी पाणीवाटपाबाबत भाष्य केले. नाशिकमधील कुंभमेळ्यासाठी जायकवाडीचे पाणी रोखल्याचा आरोप फेटाळत ते म्हणाले की, कुंभमेळ्यासाठी फार मोठा साठा आरक्षित ठेवलेला नाही. २०२४ मध्ये जायकवाडीत ६० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी असताना समन्यायी पाणीवाटप नियमांनुसार पाणी सोडले होते. परंतु, सध्याची परिस्थिती वेगळी आहे. जेव्हा
सर्वांच्या सहकाऱ्याची गरज
समृद्धी महामार्गावरील शेतकरी
आंदोलनाबाबत ते म्हणाले की, अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चा करण्याचे आश्वासन दिले असून सर्व माहिती लेखी स्वरूपात दिली आहे. उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
जेव्हा जायकवाडीत पाण्याची गंभीर टंचाई निर्माण झाली, तेव्हा पाणी सोडण्यात आले आहे.
नांदूर मधमेश्वरप्रकरणी बोलताना त्यांनी सांगितले की, गोदावरी नदीतून थेट एक्सप्रेस कालव्यात पाणी दिले जाते. या व्यवस्थेशी संबंधित धरणांमधील उपलब्ध पाण्याचा आढावा घेऊन नियोजन केले जाईल. यावर निर्णय घेण्यासाठी २ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये कालवा सल्लागार समितीची
बैठक होणार आहे. विखे पाटील यांनी स्पष्ट केले की, ८ टीएमसी पाणी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही; उपलब्ध जलसाठ्याचे ऑगस्ट २०२७ पर्यंतच्या गरजा लक्षात घेऊन नियोजन करावे लागेल. ज्या धरणांमधून रब्बीसाठी तीनदा पाणी दिले जायचे, तेथे आता केवळ एकदाच पाणी देणे शक्य होईल. 'एल निनो'चा प्रभाव आणि बाष्पीभवन यांमुळे जलउपलब्धतेवर परिणाम होत असल्याने पिण्याच्या पाण्याचा साठा सुरक्षित ठेवणे प्राधान्याचे आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions