बाजार समितीचा पेट्रोलपंप शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवावा

Foto
खरीप शेतकरी कृती समितीची मागणी

वैजापूर, (प्रतिनिधी) : लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समिती, पुरवठा विभाग, तहसील कार्यालय, गंगापूर यांना शेतकरी कृती समितीचे जाधव, महेश गुजर, राहुल ढोले पाटील, अनिल चव्हाण, बाबासाहेब गव्हाणे यांच्या वतीने निवेदन दिले. लासूर स्टेशन बाजार समितीच्या पेट्रोलपंपावर फक्त शेतकऱ्यांसाठी डिझेल-पेट्रोल राखीव करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

सध्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे देशभरात डिझेलटंचाई निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. उपलब्ध इंधन साठ्याचे योग्य नियोजन होत नसल्याने ग्रामीण भागातील हंगामातील मशागतीसाठी डिझेल-पेट्रोल मिळवण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत असून, अनेक ठिकाणी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. 

खरीप हंगामाची मशागत खु असून, शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पंप व इतर कृषी यंत्रांसाठी डिझेल-पेट्रोल लागत आहे; परंतु मुबलक वेळेत डिझेल मिळत नसल्याने मशागतीची कामे खोळंबली असून, त्याचा थेट परिणाम खरीप पेरणीवर होणार आहे. त्यामुळे उंबरठा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. 

शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेता. कृषी क्षेत्रासाठी इंधनाचा स्वतंत्र राखीव साठा उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक आहे. त्या अनुषंगाने कृषी उत्पन्न बाजार समिती, लासूर स्टेशन यांच्या मालकीच्या पेट्रोलपंपावर शेतकऱ्यांसाठी डिझेल व पेट्रोल राखीव करून शेतकरी ओळखपत्र पाहून वाटप करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. आम्हाला असा कोणताही अधिकार नाही की, फक्त शेतकऱ्यांनाच डिझेल किंवा पेट्रोल देण्यात यावे. हा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे. शासनाचा आदेश आला तर नक्कीच डिझेल किंवा पेट्रोल फक्त शेतकऱ्यांनाच देण्यात येईल.