हॉटेल, गॅरेज, पान टपरीतील लाखोंचे साहित्य खाक
वैजापूर, (प्रतिनिधी): शिऊर बंगला येथील व्यापारी दुकानांना सोमवारी पहाटे चार वाजता अचानक आग लागली. या आगीमध्ये आठ ते दहा हॉटेल, टफ्या, रसवंती खाक झाल्या. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र, लाखो रुपयांचे नुकसान झाले.
छत्रपती संभाजीनगर-नाशिक महामार्गावर असलेल्या शिऊर बंगला येथे पहाटेच्या आग राज्य
लागल्याची घटना उघडकीस आली. श्रीराम पेट्रोलपंपाच्या उजव्या बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये अनेक हॉटेल, टपऱ्या गॅरेज, रसवंतीची दुकाने आहेत. पीडब्ल्यूडीच्या गेस्ट हाऊससमोर असलेल्या हटिलमुळे अनेकांचा उदानिर्वाह चालतो, पाठीमागील मोकळ्या ग्राउंडमध्ये आग लागली असण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पहाटेची वेळ असल्यामुळे हॉटेल व्यावसायिक कोणीही हजर
नव्हते. मात्र, हॉटेलच्या सुरक्षेसाठी दोन हॉटेलचालक हटिलमध्ये झोपलेले होते. अचानक घुरांचे व आगीचे लोळ दिसू लागल्याने त्यांना जाग आली. तोपर्यंत या आगीने रौद्ररुप धारण केले होते. आग लगल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी आग विझविण्यासाठी तसेच बचावासाठी धाव घेतली होती. आठ ते दहा हॉटेलमधील फ्रीज, साहित्य, फर्निचर सर्व खाक झाले.
सुदैवाने पेट्रोलपंप वाचला
पेट्रोलपंपालागत असलेल्या हॉटेल परिसरात लागलेल्या आगीचा वणवा हा जवळपास शंभर ते दीडशे फुटांवर पसरला होता, या आगीमध्ये सर्व हॉटेल खाक झाल्या. हॉटेलमध्ये झोपलेल्या कामगारांनी तातडीने हॉटेलमधील सिलिंडर बाहेर काढले. त्यामुळे मोठा स्फोट होण्यापासून वाचला. आगीचा वणवा पेट्रोलपंपाकडे गेला असता तर मोठा अनर्थ घडला असता. वैजापूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून शिऊरचा उल्लेख करण्यात येतो. या गावाची लोकसंख्या तालुक्यातील इतर गावपिक्षा मोठी आहे. बाजारपेठेचे गाव म्हणून ओळखले जाते. गावात तसेच बंगला येथे मोठमोठ्या बाजारपेठा आहेत. या बाजारपेठेत अनेक व्यावसायिकांचे मोठे गाळे आहेत. सर्व कर ग्रामपंचायत वसूल करते. ग्रामपंचायतीकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा अपुऱ्या असल्या तरी ग्रामपंचायत हक्काने कर वसूल करते. यापूर्वदिखील कृषी व्यावसायिकाच्या दुकानाला आग लागली होती. त्यानंतर गाव पातळीवर अग्निशमन यंत्रणा कार्यरत असावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, सत्ताधा-यांच्या उदासीनतेमुळे आगीपासून संरक्षण मिळावे अशी कुठलीच यंत्रणा ग्रामपंचायतीने उभी केली नाही. एकीकडे कर घ्यायचा आणि दुसरीकडे सोयी सुविधा द्यायच्या नाही, या भूमिकेमुळे व्यावसायिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
सीसीटीव्ही तपासणी करणार
हॉटेल व्यवसायिकांचे लाखोचे साहित्य आगीत खाक झाले असून, ही आग नेमकी लागली कशाने, याचा शोध पोलिसांनी घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. आगीचे नेमके कारण समजण्यासाठी परिसरातील सर्व सीसीटीव्हींची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आगीचे कारण अस्पष्ट
पहाटेच्या सुमारास लागलेल्या या आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे, आग कशामुळे लागली, याबद्दल शंका उपस्थित करण्यात येत आहे, आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
https:/epaper.sanwartations Powered By: Vrudhee Solutions













