कुलगामच्या मास्टरमाइंडला कंठस्नान, लश्कर कमांडर लतीफ भट्ट चकमकीत ठार; कुलगाममध्ये भारतीय सैन्याची मोठी कारवाई

Foto
जम्मू  : जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाम येथे सुरक्षा दलांनी एका चकमकीत लश्कर-ए-तोयबाचा  कमांडर लतीफ अहमद भट याला ठार केले आहे. बुधवारी (१८ नोव्हेंबर) पहाटे कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यादरम्यान, सैनिकांनी लतीफला घेरले आणि आत्मसमर्पण करण्यास सांगितले. मशिदीत लपून बसलेल्या लतीफ भटने आत्मसमर्पण करण्यास नकार दिल्यानंतर तो चकमकीत ठार झाला. तो सीआरपीएफच्या चौकीवरील हल्ल्यात सामील होता आणि त्याचा शोध सुरू होता. अशातच सुरक्षा दलाने त्याला कंठस्नान घालत मोठी कारवाई केली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी बुधवारी शोधमोहीम सुरू केली होती. दरम्यान, सुरक्षा दलाचा एका दहशतवाद्याशी सामना झाला. मंगळवारी रात्री उशिरा गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसरात घेराबंदी आणि शोधमोहीम () सुरू केली. त्यानंतर, बुधवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास जंगलपोरा परिसरात गोळीबार झाला.

दहशतवाद्याने आत्मसमर्पण करण्यास नकार दिला
अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, परिसरात लश्कर-ए-तोयबाचा कमांडर लतीफ भट याची उपस्थिती लक्षात आल्यानंतर सुरक्षा दलांनी ही कारवाई सुरू केली. संपूर्ण परिसर घेराव घालण्यात आला होता. भट मशिदीत अडकला होता आणि त्याला आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. अधिकार्‍यांनी सांगितले की, संशयित दहशतवादी जंगलपोरा येथील मशिदीत अडकला होता. सुरक्षा दलांनी त्याला आत्मसमर्पण करण्यास सांगितले आहे, परंतु त्याने नकार दिला आहे. यामुळे गोळीबार झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, ११ नोव्हेंबर रोजी, जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील नौपुरा मीर बाजार येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) चौकीवर दोन सशस्त्र दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात तीन जवान जखमी झाले होते. उमर निसार दारने लतीफ भटसोबत मिळून सुरक्षा दलांवर हल्ले करण्यासाठी लक्ष्य निश्चित करण्याकरिता मीर बाजार, अखरान, हब्लिश आणि किलम यांसारख्या अनेक ठिकाणांची टेहळणी केली होती. ११ नोव्हेंबर रोजी, उमर निसार दारने लतीफ भटसोबत मिळून हा हल्ला केला आणि त्यानंतर तो फरार झाला होता.

कोण होता लतीफ भट?
लश्कर-ए-तोयबाचा () कमांडर लतीफ अहमद भट जम्मू आणि काश्मीरच्या विविध भागांमध्ये छोटे हल्ले करत असे आणि स्थानिक लोकांमध्ये मिसळून कोणाच्याही नजरेत न येता वावरत असे. त्याला शोधणे अत्यंत कठीण होते. तो २०२० मध्ये घरातून निघून गेला होता. लतीफ काश्मीरमधील अनेक हल्ल्यांमध्ये सामील होता. त्याच्यावर स्थलांतरित मजुरांच्या हत्येचाही आरोप आहे. तो कुलगामचा रहिवासी आहे. त्याचे कुटुंब ख्रेवन चादर या गावात राहते. लतीफने नोव्हेंबर २०२० मध्ये आपले कुटुंब सोडले आणि त्यानंतर तो लश्कर-ए-तोयबामध्ये सामील झाला. लतीफने लश्कर-ए-तोयबाच्या वतीने अनेक हल्ले केले आहेत, ज्यात सैन्यात भरती होण्यासाठी परतणार्‍या किश्तवार जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्‍यांच्या हत्येचा समावेश आहे. लतीफ लश्कर-ए-तोयबाची प्रॉक्सी संघटना असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंटच्या नावानेही हल्ले करतो. या संघटनेला पाकिस्तानकडून सूचना मिळतात. लतीफच्या मदतीने आयएसआय आपले जाळे मजबूत करण्याचे काम करत होती.