कचरा कोंडीसमोर महापौर घोडेले हतबल, म्हणाले- माझ्या शेतात कचरा टाका

Foto

औरंगाबाद - गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेला कचऱ्याचा प्रश्न अद्यापही कायम असून, शहरात ठिकठिकाणी रस्त्यावरच कचऱ्याचे ढीग पडलेले दिसून येत आहेत. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात मनपा प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे.  यातच नुकत्याच झालेल्या घनकचरा व्यवस्थापनाच्या बैठकीत अधिकाऱ्यांनी समस्यांचा पाढा वाचल्याने कचरा कोंडी समोर हतबल झालेल्या महापौरांनी सुक्या कचऱ्याच्या गोण्या भरून थप्पी लावा आणि जर जागा मिळालीच नाही तर माझ्या शेतात टाका पण शहरातील कचरा उचला असे वक्तव्य केले.

 

 गेल्या काही महिन्यापासूनचा कचरा प्रश्न अद्यापही कायम असूनकचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नऊ ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्र सुरू करण्याचे निषश्चित करण्यात आले. मात्र केवळ चिकलठाणा येथे कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. 16 टन क्षमता दाखवण्यात आलेल्या या यंत्राची प्रत्यक्ष क्षमता दोन टन असल्याने आणि मनपा जर याच केंद्रावर अवलंबून राहून याच पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रिया केली गेली तर कचऱ्याचा प्रश्न कसा मार्गी लागणार असा प्रश्न घनकचरा व्यवस्थापन या बैठकीत उपस्थित झाल्याने तसेच कचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख भोंबे यांनी शहरातील प्रभाग क्रं 7 आणि 9 मध्ये सर्वाधिक कचऱ्याची समस्या असल्याचे सांगितले. यावर हतबल झालेल्या महापौरांनी तातडीने साठ हजार गोण्या मागवण्याची सूचना देऊन सर्व सुका कचरा गोण्यात भरून थप्पी लावण्याचे आदेश देत याला जर जागा मिळाली नाही.माझ्या शेतात टाका कचरा असा सल्ला अधिकाऱ्यांना दिला.


साहेब तुम्ही किमान फोन उचलत जा ....

या बैठकीत महापौर चांगलेच संतापले दिसून आले. कचरा कोंडी वरून चांगल्या गाजलेल्या या बैठकीत एका अधिकाऱ्याला तुम्ही फोन का उचलत नाही ? असा सवाल करीत  अहो साहेब तुम्ही किमान फोन तरी उचलत जा अशी विनवणी महापौर घोडेले यांनी केली.