महापौरांकडूनच वाहतूक नियमाचे उल्‍लंघन

Foto

औरंगाबाद- सर्वच वाहन चालकांनी सुरळीत व सुरक्षित प्रवास करावा यासाठी शहरात वाहतूक पोलिसांनी विविध चौकात वाहतूक सिग्‍नल बसविले आहेत. सर्वसामान्य व्यक्‍तीने वाहतूक सिग्‍नल न पाळल्यास त्यास पोलिस दंड आकारतात. पण शहरातचे महापौरच जर वाहतूक नियमांचे उल्‍लंघन  करीत असतील तर शहरातील जनता त्यांचा काय आदर्श घेतील, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

 

नवीन वर्षाचा पहिला दिवस जानेवारी मंगळवार, वेळ सकाळी ९.१५ ची ठिकाण शासकीय दूध डेअरीसमोरील चौक काल्डा कॉर्नरकडून मुख्य रस्त्याला लागणार्‍या सिग्‍नलचालक दिवा लागलेला दहा, १५ दुचाकी, चारचाकी वाहनचालक लालदिवा असल्याने थांबलेले पण अशात सायरन वाजवित काल्डा कॉर्नरकडून भरधावपणे महापौर नंदकुमार घोडेले यांची गाडी आली व वाहतूक नियमांचे उल्‍लंघन करीत मोंढा नाका रोडच्या दिशेने निघून गेली. यावेळी सिग्‍नलजवळ उभ्या असलेल्या एका स्कूटीस्वार महिलेने म्हटले की, महापौरांना वाहतूक नियमांचे उल्‍लंघन करणे अलाऊड आहे का? असा प्रश्‍न उपस्थित केला. वाहतूक पोलिस थर्टीफस्टचा बंदोबस्त केल्याने सकाळी ड्युटीवर आलले नव्हते. पण सर्वसामान्य व्यक्‍तीने जर वाहतूक नियमाचे उल्‍लंघन केले त्यास लगेचच दंड आकारला जातो. पण महापौरांसारख्या प्रथम नागरिकानेच जर नियम भंग केला तर सर्व सामान्याचे काय, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.