छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : सिडको आणि गारखेडा परिसरात चोरट्यांच्या टोळीने धुमाकूळ घालत दहशत निर्माण केली असून सिडको एन-९ रायगडनगर परिसरात शुक्रवारी (दि. ७) मध्यरात्री अडीच ते साडेतीन वाजेच्या सुमारास चार जणांच्या टोळीने लागोपाठ मेडिकल दुकाने लक्ष्य करत गल्ल्यातील रोकड पळवली. विशेष म्हणजे, चोरी करण्यासाठी कोणत्याही लोखंडी हत्याराचा वापर न करता केवळ हाताच्या ताकदीने शटर उचकटण्याची नवी क्लृप्ती या चोरट्यांनी वापरली आहे. या चोरीप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रायगडनगर भागातील बळीराम पाटील शाळेजवळ ही घटना घडली, चोरट्यांनी शटर उचकटण्यासाठी कोणतेही टूल किंवा रॉड न वापरता, चार जणांनी एकाच वेळी ताकद लावून शटर ओढून पुढे सरकवले व आत प्रवेश केला. या टोळीने मेडिकलचे कुलूप तोडून ३५ हजार आणि लगतच्या न्यू अंश मेडिकलमधून ६ हजार रुपये अशी ४१ हजारांची रोकड लांबवली, याशिवाय आणखी एक मेडिकल शॉप फोडण्यात आले आहे. त्यामुळे कामावरून काढलेल्या अथवा काम न दिलेल्यांनी हे कृत्य केले असावे या दिशेने सिडको
गारखेडा परिसरात घरे फोडली
▶ पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी धुमाकूळ घालत दोन घरांतून चोरट्यांनी सोन्या चांदिचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे १ लाख १२ हजार रुपयांचा ऐवज पळवला. राजेशनगर येथील विजया लक्ष्मी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या श्रद्धा जितेंद्र नागरे (२७) यांच्या घरात २ ते ३ ऑगस्ट दरम्यान घरफोडी झाली. चोरट्याने सोन्याच्या दागिन्यांसह २२ हजार रुपये किमतीचा ऐवज पळवला तर दुसऱ्या घटनेत शवंतनगर परिसरातील पुष्कराज मुकुंदराव चौधरी (३५) यांच्या घरातून ७ ऑगस्ट रोजी पहाटे १ ते सकाळी ६ वाजेदरम्यान कपाटातून ५ हजार रुपयांची रोकड आणि १५ हजार रुपये किमतीचा ऐवज पळवला. दोन्ही घटनांमध्ये चोरट्यांविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालार राठोड आणि डोंगरे करीत आहेत.
पोलिस तपास करत आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कारसह ४ संशयितांचा शोध सुरू आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions












