दुसऱ्या दिवशी ५८ लाखांवर दंड वसूल; हेल्मेट वापराचे पोलिसांचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): दुचाकीस्वारांचे अपघाती मृत्यू रोखण्यासाठी पोलिसांनी हेल्मेट सक्ती मोहीम सुरू केली आहे. बुधवारी सुमारे ५ हजार १७५ दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून तब्बल ५८ लाख ८९ हजार १५० रुपयांचा दंड आकारण्यात आला असून, यातील ४७ हजार ५०० रुपयांचा दंड जागेवरच वसूल करण्यात आला आहे. सलग तीन दिवस वर्तमानपत्रे आणि पोलिसांकडून दिलेल्या इशाऱ्यानंतर आता वाहनचालक हेल्मेट परिधान करू लागल्याचे चित्र शहरात दिसत आहे. शहराचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दुचाकी
0088
चालवताना सुरक्षेसाठी नागरिकांनी हेल्मेटचा सक्तीने वापर करावा, असे आवाहन केले होते.
भरधाव दुचाकी वाहनाचा अपघात होऊन वाहनचालकाचा मृत्यू होण्याच्या घटनामध्ये लक्षात आल्यावर पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी शहरात हेल्मेट सक्तीची मोहिम राबविण्याचे आदेश दिले होते. पोलिस उपायुक्त
शर्मिष्ठा घारगे वालावलकर, शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक आयुक्त सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक पवन चौधरी, रेखा लोंढे, नीतू तायडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक रविकांत गधे, सिचन मिरधे आदींच्या पथकाने मंगळवारी हेल्मेट सक्तीची कारवाई राबविण्यास सुरुवात करण्यात
आली. शहर वाहतूक शाखा पोलिसांनी बाबा पेट्रोल पंप चौक, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, सिटीचौक, औरंगपुरा, रेल्वेस्टेशन, क्रांतीचौक, सिडको बसस्थानक चौक परिसर, ओएसिस चौक, हर्सल टी पॉईन्ट चौक आदी ठिकाणी विनाहेल्मेट वाहन चालविणाऱ्या कारवाई केली. वाहनधारकावर
व्यापारी महासंघाचे पोलिस आयुक्तांना निवेदन
पोलिस आयुक्तांच्या हेल्मेट सक्तीला व्यापारी महासंघाने विरोध दर्शविला आहे. याबाबत त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्याकडे दिले आहे. सणासुदीच्या काळात बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांच्या अडचणींकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, शहराबाहेरील महामार्गांवर हेल्मेट सक्तीची कठोर अंमलबजावणी करण्यास व्यापारी महासंघाचा विरोध नसल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या निवेदनावर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय कांकरिया, उपाध्यक्ष लक्ष्मीनारायण राठी आणि सरचिटणीस (महासचिव) शिवशंकर स्वामी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
या चौकांमध्ये कारवाईवर भर
हसूल टी, मुकुंदवाडी चौक, जळगाव टी, केंब्रिज चौक, हायकोर्ट सिग्नल, सेव्हन हिल, दर्गा चौक, आकाशवाणी चौक, अमरप्रीत चौक, क्रांती चौक, अदालत रोड, महावीर चौक, रेल्वे स्टेशन चौक, कार्तिकी चौक, मिल कॉर्नर चौक, नगरनाका, ए.एस. क्लब चौक, ओअॅसिस चौक आणि कामगार चौक अशा शहरातील जवळपास सर्वच प्रमुख चौकांमध्ये नाकाबंदी करून ही विशेष मोहीम राबविण्यात आली.














