आमदार अब्दुल सत्तार यांच्या निर्देशाने निराधार योजनेची बैठक उत्साहात

Foto
सिल्लोड (प्रतिनिधी), : आमदार अब्दुल सत्तार यांच्या निर्देशानुसार सिल्लोड तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेची आढावा बैठक नुकतीच पार पडली.

तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत लाभार्थ्यांच्या पात्र ऑनलाइन प्राप्त संचिकांवर निर्णय घेण्यात आला. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या १५८ तर श्रावणबाळ सेवा योजनेच्या २२७ अशा एकूण ३८५ पात्र संचिकांना मंजुरी देण्यात आली. आमदार अब्दुल सत्तार यांच्या सूचनेनुसार निराधार योजनांबाबत नियमित बैठका घेतल्या जात संजय गांधी निराधार योजनेच्या १५८ तर श्रावणबाळ सेवा योजनेच्या २२७ संचिकांना मंजुरी
असून त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना योजनांचा शासनाच्या लाभवेळेत मिळत आहे. 

लाभार्थ्यांना अनावश्यक विलंब होऊ नये, तसेच प्रत्येक पात्र व्यक्तीपर्यंत शासनाच्या सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ पोहोचावा, यासाठी नियमानुसार निश्चित कालावधीत बैठका घेण्याचे निर्देश आमदार सत्तार यांनी प्रशासनाला दिले आहेत. या बैठकीत प्राप्त झालेल्या सर्व ऑनलाइन अर्जाची छाननी करून पात्र संचिकांवर निर्णय घेण्यात आला. 

दरम्यान, संचिकांमध्ये आवश्यक २५ कागदपत्रे अथवा इतर त्रुटी आढळून आल्याने त्या प्रलंबित ठेवण्यात आल्या आहेत. संबंधित लाभार्थ्यांना याबाबत स्वतंत्रपणे माहिती देण्यात येणार असून त्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तातडीने करावी, जेणेकरून पुढील बैठकीत त्यांच्या संचिकांनाही मंजुरी देता येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

आमदार अब्दुल सत्तार यांनी आवाहन केले आहे की, ज्या नागरिकांच्या संचिका आवश्यक कागदपत्रांच्या अभावी नामंजूर किंवा प्रलंबित राहिल्या आहेत त्यांनी आवश्यक पूर्तता करून तहसील कार्यालयात सादर करावी. तसेच, निराधार योजना किंवा श्रावणबाळ सेवा योजनेसाठी पात्र असूनही अद्याप अर्ज दाखल न केलेल्या वयोवृद्ध, निराधार, विधवा, दिव्यांग तसेच इतर पात्र नागरिकांनी विलंब न करता तहसील कार्यालयात अर्ज दाखल करून शासनाच्या योजनांचा लाभघ्यावा.