सिल्लोड, (प्रतिनिधी): जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्यासह विविध विभागांचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते. मतदारसंघातील प्रलंबित विकासकामे, मंजूर योजनांची सद्यस्थिती, शासन स्तरावरील अडचणी तसेच नागरिकांच्या विविध प्रश्नांचा सविस्तर आढावा घेऊन संबंधित विभागांना वेळेत आणि गुणवत्तापूर्ण कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
बैठकीत मतदारसंघातील सुरू असलेल्या व प्रस्तावित विकासकामांचा सखोल आढावा घेण्यात आला. जलजीवन मिशन, वाटरग्रीड योजना, मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते, स्मशानभूमी, दफनभूमी व कब्रस्तान विकासकामे यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी, अजिंठा अप्पर तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात भौगोलिकदृष्ट्या जवळील
गावांचा समावेश करणे, विविध विभागांतील रिक्त पदे भरणे, सिल्लोड येथील नवीन प्रशासकीय इमारतींकडे जाणारे रस्ते व प्रवेशद्वार उभारणी, तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयांची प्रलंबित कामे, डोंगरी भागाच्या निकषात गावांचा समावेश, महावितरणच्या विविध विकासकामांचा आढावा, सिल्लोड, भोकरदन संयुक्त पाणीपुरवठा (खडकपूर्णा) योजना, सिल्लोड शहरासाठी म्हाडा घरकुल योजना, अजिंठा लेणी परिसरातील शिवपार्क, भीम पार्कच्या कामांना गती देणे व संत सेवालाल महाराज स्मारकासाठी प्रस्ताव सादर करणे, फर्दापूर गावाचे ड्रोन सर्वे क्षण करून प्रॉपर्टी कार्ड तयार करणे, अजिंठा घाटातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना, राष्ट्रीय महामार्गावरील अपूर्ण कामे पूर्ण करणे, पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी गटारांची कामे, पीक विमा दावे, गाळमुक्त धरणगाळयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबविणे, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सिंचन प्रकल्पांची दुरुस्ती, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतील लाभार्थ्यांच्या केवायसीसाठी विशेष शिबिरे, घरकुल योजनेचे हप्ते वेळेत वितरित करणे, वन्य प्राण्यांमुळे होणारे नुकसान रोखण्यासाठी उपाययोजना, सामाजिक वनीकरण विभागाचे उद्दिष्टपूर्ण काम, शिक्षण व आरोग्य विभागातील रिक्त पदे तातडीने
-- आ. सत्तार यांच्या सूचना --
यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी प्रत्येक विभागाचा स्वतंत्र आढावा घेत नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या. मंजूर कामांना तात्काळ गती देणे, प्रलंबित प्रस्ताव शासनाकडे पाठविणे, निधी उपलब्ध करून विकासकामे वेळेत पूर्ण करणे आणि नागरिकांना शासनाच्या योजनांचा प्रभावी लाभ मिळेल यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. भरणे, पर्यटन, पुरातत्त्व, रोजगार हमी योजना, कृषी विभाग तसेच इतर विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.













