मोहरा येथे उल्का वर्षावाचे निरीक्षण

Foto
कन्नड, (प्रतिनिधी) : एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र व क्लब छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने मोहरा येथील कै. पुंडलिकराव पाटील माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय येथून उल्का वर्षावाचे निरीक्षण करण्यात आले.

मार्गदर्शन छत्रपती संभाजीनगर येथील २७ तर मोहरातील ३३ अशा ६० ६५ जणांनी यात सहभाग नोंदविला होता. या कार्यक्रमाचे नेतृत्व एमजीएम विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी केले. त्यांनी अंतराळ विज्ञान व खगोलशास्त्राविषयी केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि कुतूहल जागृत झाले. निरीक्षण सत्रादरम्यान योगेश साळी व योगेश चव्हाण यांनी सहभागी विद्यार्थ्यांना व खगोलप्रेमींना दुर्बिणीच्या साहाय्याने शनि ग्रहाची सुंदर कडी, गुरू (ज्युपिटर) ग्रह तसेच त्याचे चार चंद्र, कृत्तिका खुला तारकासंघ, आपली शेजारील आकाशगंगा देवयानी तसेच इतर अनेक खगोलीय पिंडांचे मनोहारी दर्शन घडवले.

१४ रोजी सायंकाळी सूर्यास्तापासून आकाश निरीक्षणाचा कार्यक्रम सुरू झाला. प्रत्यक्ष उल्का वर्षाव निरीक्षण रात्री साडेनऊ ते पहाटे सहापर्यंत दरम्यान करण्यात आले. या कालावधीत चाळीसहून अधिक तेजस्वी उल्का तर मंद प्रकाशमान उल्का सुमारे सव्वादोनशे एकूण दोनशेसाठ उल्कांची नोंद करण्यात आली.  उल्का वर्षाव निरीक्षण कार्यक्रम यशस्वी आयोजनासाठी एमजीएम विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर, व्यवस्थापक अशोक क्षीरसागर, विज्ञान संवादक योगेश साळी, योगेश चव्हाण तसेच शाळेचे मुख्याधापक संतोष शिंदे, विज्ञान शिक्षक अतुल घडमोडे, सचिन पाटील यांचे सहकार्य लाभले.