मंत्री अर्जुन खोतकरांनी दिला रावसाहेबांना चकवा! सत्तारांशी गळाभेट; भाजपचा चक्रव्यूह भेदणार का अर्जुन ?

Foto
 जालन्यातील आरोग्य शिबिरात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी गळा भेट घेतल्याने चर्चेत आलेले राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध विकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दुसर्‍याच दिवशी काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांची गळाभेट घेतली. खोतकर यांच्या या चकव्याने रावसाहेबांचे कार्यकर्ते हवालदिल झाले आहेत. दरम्यान, अर्जुनाला चक्रव्यूहात अडकविण्याची नीती भाजपने आखली आहे. आज सहकारमंत्री अर्जुनराव यांची भेट घेत आहेत.

लोकसभाच्या एक एक जागेसाठी भाजपने चांगलाच जोर लावला आहे. देशभरातील प्रत्येक जागेवर भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे लक्ष आहे. नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी साम-दाम-दंड-भेद या सर्व अस्त्रांचा वापर करण्याची तयारी भाजपने चालविली आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची जागा भाजप साठी किती महत्वाची आहे याचा अंदाज  खोतकर यांच्या भोवती टाकलेल्या चक्रव्यूहाहून लक्षात येतो. सेनेशी युती करताना  दानवे-खोतकर वाद समोर येऊ नये याची दक्षता भाजपने घेतली. उद्धव ठाकरे यांचे मन परिवर्तन करण्यात भाजप नेते यशस्वी झाले. मात्र युती झाली तरी आपण लोकसभेची जागा लढविणारच यावर अर्जुन खोतकर ठाम राहिल्याने   भाजप नेते घायाळ झाले. कालची गळाभेट फारशी परिणामकारक ठरली नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीची झालेली आघाडी, आ. बच्चू कडू यांनी पेटवलेले रान आणि स्वपक्षीयांतील नाराजांनी खा.दानवे यांच्यापुढे मोठे आव्हान उभे केले आहे. त्यामुळेच प्रदेशाध्यक्षाची जागा वाचविणे भाजपसाठी प्रतिष्ठेचे बनले आहे. अशावेळी खोतकर यांची गळाभेट भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढविणारी ठरली होती. मात्र, दुसर्‍याच दिवशी या आनंदावर विरजण पडले. खोतकर यांनी सिल्‍लोड नगर परिषदेच्या कार्यक्रमात हजेरी लावून आ. सत्तार यांचे गुणगान केले. त्यामुळे नेमके खोतकर यांच्या मनात चाललेय तरी काय? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker