राज्यमंत्री अतुल सावे यांची हिंगोलीच्या पालकमंत्रीपदी वर्णी

Foto
 
औरंगाबाद: नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात उद्योग, खनिकर्म, अल्पसंख्याक व व वक्फ विभागाचे राज्यमंत्री म्हणून निवड झालेल्या अतुल सावे यांच्यावर आणखी एक जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्याकडे हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. 

 माजी सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांनी राजीनामा दिल्याने हिंगोलीचे पालकमंत्रिपद रिक्त झाले होते. त्यामुळे याठिकाणी पालकमंत्री म्हणून कोणाची वर्णी लागते याविषयी उत्सुकता होती. राज्यमंत्री अतुल सावे यांची हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून निवड झाल्याने ही उत्सुकता आता संपली आहे. एक यशस्वी उद्योजक ते मंत्री  असा अतुल सावे यांचा आतापर्यंतचा प्रवास राहिला आहे.