मनपावर मंत्री अतुल सावे यांचे वर्चस्व.

Foto

छत्रपती संभाजीनगर : गेली तीस वर्षे मनपावर शिवसेनेचे वर्चस्व होते. या काळात शिवसेना आणि भाजप यांची युती असल्याने भाजपला  दुय्यम स्थान मिळत होते. पण यावेळी बहूजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी मनपा निवडणुकीत लक्ष घालून भाजपाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आणले. त्यामुळे भाजपाचा महापौर झाला. स्थायी समिती सभापती पदासाठी अनिल मकरिये या निष्ठावंत कार्यकर्त्यांला संधी दिली. त्यामुळे मनपावर मंत्री अतुल सावे यांचे वर्चस्व निर्माण झाले आहे.                                    
 महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक जानेवारी महिन्यात पार पडली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदाच आपली शक्ती दाखविण्याचे काम केले.  जिल्ह्यात नऊ पैकी सहा आमदार असल्याने जिल्ह्यात शिवसेनेचे वर्चस्व होते. महानगर पालिकेतही यापूर्वी गेली तीस वर्ष शिवसेनेचे वर्चस्व होते. पण यावेळी भाजपा नेतृत्वाने बहूजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्यावर मनपा निवडणुकीची जबाबदारी टाकली. आणि मनपा भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात घेण्यासाठी सावे यांनी रणनीती आखली. अतुल सावे यांनी निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक प्रभागाचा अभ्यास करून उमेदवार उभे केले. त्यामुळे पहिल्यांदा ५७ नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे निवडून आले. बहुमतासाठी फक्त एक नगरसेवक कमी पडला. पण युतीतील मित्र पक्ष शिवसेना यांचे १३ नगरसेवक विजयी झाले. त्यामुळे मनपात युतीचे बहुमत झाले. या युतीच्या माध्यमातून महापौर व स्थायी समिती सभापती भारतीय जनता पक्ष यांनी पटकावले. मंत्री अतुल सावे यांनी आखलेल्या रणनीतीमुळे. आजघडीला मनपात अतुल सावे यांच्या शब्दाला महत्व प्राप्त झाले असून त्यांचे वर्चस्व निर्माण झाले आहे.