आईशी वाद झाल्याने अल्पवयीन मुलगी बेपत्ता

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : आईशी वाद झाल्यानंतर  मुलगी रागाच्या भरात घरातून निघून गेल्याची घटना 31 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास मुकुंदवाडी परिसरातील रामनगरात घडली. आईने तिच्या अपहरणाचा संशय व्यक्त केला आहे.
अल्पवयीन पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली. 31 जानेवारी रोजी दुपारी 2च्या सुमारास त्या व त्यांची मुलगी घरी होत्या. यावेळी मुलगी गॅलरीत उभी असल्याने तिला घरात येण्यास सांगितले असता वाद झाला. त्यातून आईने मुलीला चापट मारली. त्यानंतर खायला आणायला जाते असे सांगून मुलगी घरातून निघून गेली. आईने तिच्या मागे जाण्याचा प्रयत्न केला असता, मुलीने हात झटकून गल्लीतील रस्त्याने धाव घेतली. त्यानंतर ती घरी परतली नाही. कुटुंबीयांनी परिसरात तसेच नातेवाइक व मैत्रिणींकडे शोध घेतला. मात्र मुलीचा शोध लागला नाही. मुलीचे अज्ञात कारणासाठी कुणीतरी अपहरण केले असावे, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक पासलकर करीत आहेत.