पैठण, (प्रतिनिधी): सहा जानेवारी दर्पण दिनानिमित्त पैठण तालुका मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनात बाळशाश्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन निवृत्त मुख्याध्यापक जालिंदर फलके व अध्यक्ष रमेश लिंबोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी चंद्रकांत तारू, बद्रीनाथ खंडागळे, रमेश शेळके, गौतम बनकर, नंदकुमार चव्हाण, मनोज कुटेकर, विनोद लोहिया, दसरथ अडसूळ, शिवाजी गाडे, दादा घोडके, ज्ञानेश्वर बावणे,
राहुल पगारे, आशिष तांबटकर, सोमनाथ शिंदे, कैलास बर्फे, गणेश पवार, कृष्णा भुजबळ, आशुतोष पानगे आदींनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. यावेळी मुख्याध्यापक जालिंदर फलके यांनी सर्व उपस्थित पत्रकारांचा सन्मान करून आपले मत व्यक्त केले.















