देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, छत्रपती शाहु महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विशेष महत्व आहे. या महापुरुषांचे नाव घेतल्याशिवाय कोणत्या राजकीय पक्षाच्या नेत्याला पर्याय नाही. पण निवडणूंकांपुरता राष्ट्रीय पुरुषांच्या नावाचा वापर करुन घेण्याची सवय आपल्या राजकारण्यांना लागली आहे. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुक प्रसंगी भारतीय जनता पार्टीच्यावतीने शिवछत्रपतींचा आशिर्वाद, चला देऊ मोदींना साथ” हे घोष वाक्य घेऊन विविध प्रचार सभांमध्ये छत्रपती शिवाजी शमहाराजांचे आम्हीख खरे मावळे आहोत असे दाखविले आणि निवडणुका जिंकल्या.
आता पुन्हा मे 2019 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीची तयारी भाजपाकडून सुरु आहे. शनिवारी येथील श्रीहरी पॅव्हेलियन येथे भाजपाच्या बुथ प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुखांचे संमेलन प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महिला बाल कल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत पार पडले. या संमेलनात व्यासपीठावर एका बाजुला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिन दयाल उपाध्याय, भारत माता आणि श्यामप्रसाद मुखर्जी यांची छायाचित्रे लावण्यात आली होती. एरवी देशभरातील विविध ठिकाणी होणार्या सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा व महाराष्ट्रात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य भाजपाची नेते मंडळी, छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष करतात. त्यांच्या नावाने मते मागतात. पण भाजपाच्या मराठवाड्यातील चार जिल्ह्यातील महत्वाच्या संमेलनात मात्र भाजपाच्या नेत्यांना राष्ट्र पुरुषांचे फोटो लावण्याचे भान राहिले नाही. केंद्रात भाजपाचे सरकार आल्यापासून विरोधी पक्षातील नेतेमंडळी केंद्रातील सरकार संघाच्या इशार्यावर चालते. सध्या मोदींचा नव्हे तर संघाच्या अजेंड्यावर काम सुरु असल्याची टिकाही केली जाते. भारतीय जनता पार्टी ही संघाचीच राजकीय वींग आहे. पण भाजपाचे नेते नेहमी आपल्या भाषणात म्हणतात की आम्ही सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन राजकारण व समाजकारण करतो. असे म्हणून ही मंडळी समाजाची दिशाभूल करते की काय असे आता वाटू लागले आहे. ज्या राष्ट्रीय पुरुषांच्या नावाने मताचा जोगवा मागता त्याच नेत्यांचे भाजपाला वावडे का? असा प्रश्नही आता भाजपातील दलित, ओबीसी बहुजन समाजातील कार्यकर्ते उपस्थित करतांना दिसून येत आहे. विरोधी पक्षाच्या म्हणण्यानुसार राज्यातील फडणवीस सरकार ही संघाच्याच इशार्यावर चालत असून समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाचे विचार देणार्या राष्ट्र पुरुषांना दुर करण्याचाच हा प्रकार आहे का? यावरुन भाजपाचे दाखवायचे दात आणि खावयाचे दात वेगळे असल्याचे दिसून येते.