पोलिसांसह तीन जणांना चावा घेणारे माकड जेरबंद

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : फर्दापूर पोलीस ठाण्याच्या परिसरात दहशत माजऊन पोलीस कर्मच्यार्यांसह तीन जनांना चावा घेऊन जखमी करणाऱ्या वानराला अजिंठा वन विभागाच्या कर्मच्यार्यांनी रेस्क्यु करून जेरबंद करून अजिंठा येथिल वन विभागाच्या कार्यालयात घेउन गेले आहे.

फर्दापूर पोलीस ठाण्याच्या आवारात मागील दोन दिवसा पासुन अजिंठा राखिव जंगलातील एक वानर येऊन पोलीस कर्मचारी नागरीकांच्या अंगावर थाऊन जाऊन त्यांना चावा घेऊन जखमी करत होते या वानराने संतोष उबाळे या कर्मच्याराला चावा घेऊन जखमी केले तर परीसरातील आणखी दोन जणांना या वानराने चावा घेऊन जखमी केले आहे. या वानराची परीसरात दहशत निर्माण झाली होती. याच्या फितीने कर्मचारी नागरीकांना मधे भितीचे वातावरण निर्माण झाले होते. शिवाय हे वानर बाजुलाच असलेल्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा च्या रिसॉट परिसरात फिरत होते.

या मुळे पर्यटकांच्या जिविला थोका निर्माण झाला होता व जवळच असलेल्या भारतिय पुरात्तव विभागाच्या निवास्थान व पोलीस वसाहतित ही फिरून नागरिकांच्या अंगावर धाऊन जाऊन चावा घेऊन दहशत निर्माण करत होते. या वानराची गेले दोन तिन दिवसापासुन या परिसरा दहशत निर्माण झाली होती. यामुळे पोलीस ठाणे परिसरातुन जे शेतकरी येजा करत होते, त्यांनी भिती पोटी येथुन जाने येने बंद केले होले या वानराची परिसरात मोठी दहशत निर्माण झाली होती. 

फर्दापूर पोलीस ठाण्याचे सपनी प्रफुल साबळे यांनी अजिंठा वन विभागाचे परिक्षेत्र अधिकारी संतोष दोडके यांना फोन करून या बद्दल माहिती दिली अस्ता आज सकाळी अजिंठा वन विभागाचे वणपाल दीपक सोनार. वनरक्षक अशोक दांडगे. वनरक्षक डोके मॅडम. वनमजूर राजु झोंड. वनमजूर भास्कर शहाणे. शेख साजेद. सामाजिक कार्यकर्ते योगेश महाकाळ हे पिंजरा घेऊन आले व मोठी कसरत करून रेस्क्यु करून दहशत माजवुन चावा घेऊन जखमी करणार्या या वानराला आखेर जेरबंद केले व त्याला घेऊन अजिंठा येथील वन विभागाच्या कार्यालयात घेऊन गेले आहे.