दुपारनंतर आणखी रुग्णांची वाढ

Foto

जिल्ह्यात ९८२ रुग्णांवर उपचार सुरू; कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २४२० वर

औरंगाबाद जिल्ह्यात काल एकाच दिवशी १२५ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. तर आज सकाळी आलेल्या अहवालानुसार १३२ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. यात दुपारनंतर पुन्हा १३ नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. यात वेदांत नगर-१, एसआरपीएफ परिसर -२, जिल्हा परिषद परिसर-१, इटखेडा-१, बजाज नगर-१, साईनगर, पंढरपूर-१, उत्तम नगर, जवाहर कॉलनी-१, संजय नगर, बायजीपुरा -२, शहागंज-१, जटवाडा रोड-१, इतर-१ या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये १० पुरूष आणि ३ महिला रुग्णांचा समावेश आहे. यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २४२० वर गेली आहे. त्यापैकी १३१७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर १२१ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने सध्या ९८२ रुग्णांवर उपचार सुरू आहे. 
काळजी घेण्याचे केले आवाहन
दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. मात्र दुसरीकडे अजूनही अनेकजण बाजारात गर्दी करताना दिसतात. याशिवाय कुठल्याही नियमांचे पालन करत नसल्याचे देखील दिसून येत आहे. नागरिकांनी स्वतः ची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. घराच्या बाहेर पडने शक्य तेव्हढे टाळावे, याशिवाय घराच्या बाहेर जरी गेले तरी तोंडाला मास्क किंवा रूमाल लावावा, बाहेरून आल्यावर हात स्वच्छ साबणाने धुवावे. असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.