छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): हिंदू धर्मात विशेष महत्त्व
असलेला अधिक मास (पुरुषोत्तम) येत्या सोमवारी संपणार आहे. मात्र
सर्वत्र धोंड्याचा कार्यक्रमाची धामधूम
आज आणि उद्या केवळ धोंड्याच्या कार्यक्रमाचे आयोजनासाठी मिळाले आहे. त्यामुळे सासरकडून जावयांचा सत्कार, भेटवस्तू आणि भोजनाचे आयोजन करण्याची परंपरा अखेरच्या टप्यात आली आहे. त्यामुळे जावयांच्या लाडाचे आता अवघे दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. आज आणि उद्या धोंड्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले
आहे. त्याची सर्वत्र लगबग सुरू आहे.
अधिक मास हा साधारणपणे दर तीन वर्षांनी येतो. या महिन्यात धार्मिक कार्य, दानधर्म, जप तप, व्रत आणि पूजा-अर्चना यांना विशेष महत्त्व दिले जाते. महाराष्ट्रात अधिक मासात विवाहित मुली आणि जावयांना सन्मानाने घरी बोलावून त्यांचा आदरातिथ्य करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे
या महिन्यात जावयांना विशेष मान मिळतो.
अधिक मासात अनेक ठिकाणी मुलगी जावयाला घरी बोलावून पुरणपोळी, श्रीखंड, बासुंदी, आमरस, विविध गोड पदार्थ आणि पारंपरिक जेवणाचा बेत करण्यात येत आहे. काही कुटुंबांकडून जावयांना कपडे, सोन्या-चांदीच्या वस्तू, घड्याळ, मोबाईलसह इतर भेटवस्तूही दिल्या
▶ बाजारपेठेत उत्साह
अधिक मासामुळे कपडे, मिठाई, भेटवस्तू आणि पूजासाहित्याच्या विक्रीत वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. विशेषतः साठ्या, शर्ट-पेंट, मिठाईचे बॉक्स, ड्रायफ्रूट पॅक आणि धार्मिक साहित्याला मोठी मागणी राहिली. अनेक कुटुंबांनी आज सकाळपासूनच जावयांचा सत्कार करण्यासाठी बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी केली. अधिक मासाच्या समाप्तीनिमित्त विविध मंदिरांमध्ये भजन, कीर्तन, हरिपाठ, भागवत कथा, महाप्रसाद आणि सामूहिक पूजा आयोजित करण्यात आल्या आहेत. भाविकांनी महिनाभर केलेल्या व्रत-उपवासांचीही सांगता या काळात होणार आहे. अनेकांनी अन्नदान, वस्त्रदान करण्यावर भर दिला आहे.
जात आहेत. त्यामुळे अधिक मास हा जावयांसाठी आनंदाचा आणि सासरकडील मंडळींसाठी उत्सवाचा काळ मानला जात आहे.
ही परंपरा सर्वत्र कायम ठेवली
आहे. महिनाभर अधिक मासचा उत्साह दिसून आला. आता केवळ आज आणि उद्याचा दिवस बाकी राहिला आहे. त्यामुळे शहरात चांगलीच धामधूम सुरू आहे.















