वाहनधारकांनो सावधान ! उद्यापासून १ हजार रुपये दंड 'हाय सिक्युरिटी नंबर प्लेट'साठी आज शेवटची संधी

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : ज्या वाहनधारकांनी अद्याप आपल्या वाहनांवर 'हाय सिक्युरिटी नंबर प्लेट' बसवलेली नाही, त्यांच्यासाठी आज (दि.१९) शेवटची संधी आहे. २० जुलैपासून अशा वाहनांवर १ हजार रुपये दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. या संदर्भात परिवहन विभागाने कडक पावले उचलली असून वाहनधारकांना त्वरित या नियमाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. परिवहन विभागाने जारी केलेल्या नवीन
वाहतूक पोलिसांना कारवाईचे निर्देश
▶ परिवहन आयुक्त कार्यालयाने राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक कार्यालयांना याबाबत विशेष पत्र पाठवले आहे. त्यानुसार, स्थानिक वाहतूक पोलिसांना रस्त्यांवर उतरून एचएसआरपी नसलेल्या वाहनांची तपासणी करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत.
एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना नियम अनिवार्य
▶ सरकारी नियमांनुसार, राज्यात एप्रिल २०१९ पासून सर्व नवीन वाहनांना कंपनीकडूनच ही नंबर प्लेट मिळणे सुरू आहे. मात्र, एप्रिल २०१९ पूर्वी उत्पादित झालेल्या सर्व जुन्या वाहनांना आता ही 'हाय सिक्युरिटी नंबर प्लेट' बसवणे कायदेशीररीत्या अनिवार्य करण्यात आले आहे. दंड टाळण्यासाठी वाहनधारकांनी आजच अधिकृत डिलरकडे जाऊन ही प्लेट बसवून घ्यावी.
आदेशानुसार, ज्या वाहनांवर 'हाय सिक्युरिटी नंबर प्लेट' नसेल, त्या वाहनांशी संबंधित कोणतीही कामे आरटीओ कार्यालयात केली
जाणार नाहीत. त्यामुळे लायसन्स किंवा वाहन संदर्भातील इतर कामांसाठी आधी ही नंबर प्लेट असणे अनिवार्य करण्यात आले आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions