महापालिका आयुक्तांकडून १० दिवसांचा 'डेडलाईन' जाहीर १६ एमएलडी जास्तीचे पाणी मिळणार

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : सुमारे २०० कोटी रुपये खर्चुन टाकण्यात आलेल्या ९०० एमएलडी व्यासाच्या पाणी योजनेत येत्या दहा दिवसांत आवश्यक कामे करून शहराला वाढीव १६ एमएलडी पाणी मिळेल, असा दावा महापालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांनी बुधवारी (दि. १३) केला. वाढीव पाणीपुरवठ्यामुळे उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची पाणीटंचाईतून काही अंशी सुटका होणार आहे.
शहरासाठी नवीन २७४० कोटी रुपयांची पाणी योजना कार्यान्वित होईपर्यंत नागरिकांना तात्पुरता दिलासा देण्यासाठी जुन्या ७०० मिलिमीटर
व्यासाच्या पाणी योजनेचे पुनरुज्जीवन करून त्याठिकाणी ९०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या योजनेतून शहराला वाढीव ७५ एमएलडी पाणी मिळणे अपेक्षित होते. पण, सध्या २० एमएलडीपर्यंत वाढीव पाणी मिळत आहे.
ही योजना अद्याप १०० टक्के कार्यान्वित झालेली नाही. दरम्यान, शहराला सध्या मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात आयुक्त अमोल येडगे यांना पत्रकारांनी प्रश्न केला असता ते म्हणाले, सध्या पाण्याचा गॅप वाढलेला आहे. हा गॅप कमी करून दिलासा देण्यासाठी संपूर्ण यंत्रणेला टँकरमधून पाणी
चोरल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी दिला.
ही योजना पूर्ण कार्यान्वित झाल्यास वाढीव १६ ते १७ एमएलडी पाणी शहराला मिळेल. त्यानंतर दिलासा मिळू शकतो. त्यामुळे अत्यावश्यक कामे करण्याच्या सूचना करण्यात आल्या असून, येत्या १० दिवसांत हे काम पूर्ण होईल, असा दावा येडगे यांनी केला.
नियोजनाच्या अभावामुळे पाणीबाणी
शहरात येणारे पाणी मुबलक असतानाही केवळ प्रशासकीय नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना १६ ते १८ दिवसांआड पाणी मिळत आहे. यावर शिवसेना उबाठाचे नेते आणि आमदार अंबादास दानवे यांनी येत्या आठवडाभरात पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक न सुधारल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
https.repaper.sanjwarta.ini Powered By: Vrudhee Solutions