हातगाड्यांच्या विरोधात मनपा आक्रमक

Foto

फोन कुणाचाही येऊ द्या; कारवाई सुरूच ठेवा : आयुक्तांचे आदेश
छत्रपती संभाजीनगर, विरोध करण्यासारखे आहे. अशा प्रकारचा हस्तक्षेप होत असेल तर नियमानुसार कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
(सांजवार्ता ब्युरो): शहरातील प्रमुख रस्त्यांवर बिनधास्तपणे उभ्या राहणाऱ्या अनधिकृत हातगाड्यांविरोधात महापालिका प्रशासनाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. हातगाड्यांवरील कारवाईदरम्यान कुणाचेही फोन आले, तरी कारवाई थांबवू नका; उलट संबंधित फोनची नोंद घेऊन तक्रार करा, असे स्पष्ट आदेश मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी अतिक्रमण हटाव यंत्रणेला दिले. कायदेशीर कारवाईला विरोध करणे म्हणजे कायद्याला
महापालिकेची तहकूब स्थायी समिती सभा मंगळवारी झाली. यावेळी नगरसेवक राजगौरव वानखेडे यांनी शहरातील हातगाड्यांचा प्रश्न उपस्थित केला. दिल्ली गेट, हसूल टी पॉइंट, लेबर कॉलनीसह प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात हातगाड्या उभ्या राहत असून, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे त्यांनी निदर्शनास
XX
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर
आणून दिले. महापालिकेच्या नोंदीनुसार शहरात सुमारे १४ हजार नोंदणीकृत हातगाड्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात यापेक्षा मोठ्या संख्येने हातगाड्या असून,
त्यापैकी अनेकांची महापालिकेकडे नोंद नसल्याचे सभेत सांगण्यात आले. कारवाईसाठी टास्क फोर्सची मागणी एकीकडे महापालिकेचे अतिक्रमण
हॉकर्स पॉलिसी अद्याप कागदावरच
शहरातील हॉकर्स पॉलिसीचा प्रश्न मागील चार ते पाच वर्षांपासून प्रलंबित आहे. महिनाभरात फेरीवाला धोरणाबाबत निर्णय घेण्याचे संकेत आयुक्त येडगे यांनी दिले. तोपर्यंत ज्या भागात हातगाड्यांमुळे अडचणी निर्माण होत आहेत, त्या ठिकाणांची नोंद करून अतिक्रमण हटाव विभागाने कारवाई करावी, असे आदेश त्यांनी दिले. 'कुणाचा फोन आला तरी कारवाई थांबवू नका', या आयुक्तांच्या स्पष्ट भूमिकेमुळे शहरातील अनधिकृत हातगाड्यांवरील कारवाईला आता वेग येण्याची शक्यता आहे.
हटाव पथक कारवाई करत नसल्याची ओरड करायची आणि दुसरीकडे कारवाई सुरू झाल्यावर हातगाडी सोडण्यासाठी फोन करायचे, असे दुटप्पी धोरण
योग्य नसल्याचे वानखेडे यांनी सांगितले. सर्व पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी कारवाईला सहकार्य करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.