सागर प्रकाशनचे साजवार्ता
Page No.: 3 Date: 18/11/2026
१४ ग्रामपंचायतीचे होणार एकत्रीकरण
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): महापालिका हद्दीलगत असलेल्या वाळूज, सिडको महानगरसह रांजनगाव, वडगाव कोल्हाटी आणि इतर १२ अशा एकूण १४ ग्रामपंचायतींचे एकत्रिकरण करून स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्याच्या प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. या प्रक्रियेसाठी विविध विभागांकडून आवश्यक माहिती संकलित करण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. मार्चनंतर जनगणनेची अधिकृत आकडेवारी समोर येताच, लोकसंख्येच्या निकषानुसार नवीन नगरपरिषद अथवा महापालिकेचा सविस्तर प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला जाईल, अशी माहिती
या ग्रामपंचायतींचा समावेश
यात वडगाव कोल्हाटी, तिसगाव, शाहजापूर, पंढरपूर, करोडी, रांजणगाव शे. पू., वाळूज, कमळापूर, जोगेश्वरी, अनंतपुर, आंबेलोहळ आणि तुर्काबाद खराडी या गावांचा प्रस्तावात समावेश आहे.
जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिली आहे.
जिल्ह्यात वाळूज महानगरसाठी दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय स्थापन करण्यास मंजूरी मिळाली आहे. आता त्यापाठोपाठ नवीन वाळुज नगरपरिषद तयार करण्याच्या हालचालीनां देखील प्रशासकीयस्तरावर गती मिळाली आहे. वाळूज महानगरलगतच्या १२ ग्रामपंचायतींच्या हद्दीसह लोकसंख्येची माहिती संकलित करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी आऑक्टोबरमध्ये गौडा जीसी यांनी दिले होते.
त्यासाठी विविध विभागांना पत्र देखील पाठविण्यात आले होते. त्यानुसार आता जिल्हा परिषद व तहसिल कार्यालयांकडून जिल्हा प्राशसनाला आवश्यक माहिती उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सर्व माहिती एकत्रित करुन ती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे एकएक विभाग सादर करीत आहे. आता या प्राप्त माहितीनुसार मार्चमध्ये जिल्हा प्रशासन शासनाकडे नवीन नगरपरिषद अथवा लोकसंख्येच्या आधारावर क दर्जाची महापालिका स्थापनेसाठी प्रस्ताव सादर करणार आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions










