डीपी रस्त्यांवर चालणार मनपाचा बुलडोझर

Foto
Mसाजवार्ता
Date: 7/11/2026
पुढील आठवड्यापासून धडक मोहीम; रस्ते घेणार मोकळा श्वास
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): शहरातील विस्कळीत वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी आणि रस्त्यांनी मोकळा श्वास घ्यावा यासाठी महापालिका प्रशासन आता अॅक्शन मोडवर आले आहे. यापुढे केवळ ठरावीक रस्त्यांवर जुजबी कारवाई न करता, विकास आराखड्यातील (डीपी) शहरभरातील सर्वच रस्त्यांवरील अतिक्रमणे भुईसपाट करण्याचा धडक निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पुढील आठवड्यापासून या व्यापक मोहिमेला सुरुवात होणार असून, त्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी सोमवारी (दि. १६) पत्रकारांशी बोलताना दिली.
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी
संभाजीनगर महानगरपालिका छत्रपती संभाजी
विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यानुसार शहरातील रस्त्यांची संयुक्त मोजणी करण्यासाठी महापालिकेने सिटी सव्र्व्हे कार्यालयाकडे प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी आवश्यक शुल्कही भरण्यात आले आहे. मोजणीनंतर रुंदीकरणाच्या कामात अडथळा
ठरणाऱ्या मालमत्तांची निश्चिती करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. या प्रस्तावित रुंदीकरणामुळे अनेक ठिकाणची अतिक्रमणे आणि घरे बाधित होण्याची शक्यता आहे. यापूर्वी काही मालमत्तांचे संपादन करण्यात आले आहे. तसेच दुकानांसमोर ठेवण्यात येणाऱ्या हातगाड्या व साहित्यामुळे रस्त्यांची जागा व्यापली जात आहे. त्यामुळे आता डीपी रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याबरोबरच रस्त्यांच्या मोकळ्या जागेचा वापर पुन्हा अतिक्रमणासाठी होणार नाही, याकडेही प्रशासन लक्ष देणार आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने सर्व डीपी स्स्त्यांवर टप्प्याटप्प्याने कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितले.
समांतरपणे प्रक्रिया राबवण्याचे नियोजन
शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विकास आराखड्यातील सर्व रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत. यासाठी संयुक्त मोजणी, आवश्यक तेथे भूसंपादन आणि अतिक्रमण हटाव ही प्रक्रिया समांतरपणे राबविण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. मालमत्ताधारकांना मोबदलाही वितरित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, नव्या विकास आराखड्यात शहरातील ४२ रस्त्यांची प्रस्तावित रुंदी कमी करण्यात आली आहे. तरीही वाहतुकीच्या प्रवाहात अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांबाबत प्रशासन कोणतीही तडजोड करणार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. यापूर्वी शहरातील रस्त्यांवर राबविलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमांनंतरही काही ठिकाणी पुन्हा अडथळे निर्माण झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या.
कठोर उपाययोजन करणार
66 सर्व डीपी रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम पुढील आठवड्यापासून सुरू केली जाणार आहे. यापूर्वी कारवाई केलेल्या काही ठिकाणी पुन्हा अतिक्रमणे झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे नव्याने कारवाई करताना भविष्यात अशा जागांवर पुन्हा अतिक्रमण होणार नाही, यासाठीही कठोर उपाययोजना केल्या जातील.
अमोल येडगे, आयुक्त, महानगरपालिका
https:liepaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions