दुष्काळग्रस्तांसाठी मनपाचे अधिकारी-कर्मचारी देणार एका दिवसाचे वेतन

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : राज्यात जाहीर झालेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महानगरपालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी आपल्या एका महिन्याचे मानधन देण्याचा निर्णय घेतल्यानंतर, आता मनपाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही आपल्या एका दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्वेच्छा योगदानातून सुमारे ६७ लाख रुपयांचा निधी जमा होण्याचा अंदाज असून, यासंदर्भात कोणाचा आक्षेप असल्यास दोन दिवसांत प्रशासनाकडे नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महिन्याचे वेतन देण्याचे ठरविले होते. नगरसेवकांच्या या निर्णयानंतर मनपा आयुक्त अमोल येडगे यांनीही अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या एका दिवसाच्या वेतनातून मदत उभारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले होते.
अपनी संभाजीनगर महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर
दुष्काळग्रस्तांना मदत मिळावी, यासाठी ५ महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी एका
त्यानुसार प्रशासनाने आता एका दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका प्रशासनाने यासंदर्भात पत्रक काढले असून, ज्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला एका दिवसाचे वेतन देण्याबाबत आक्षेप असेल, त्यांनी बुधवार, २८ ऑक्टोबरपर्यंत प्रशासनाला कळवावे, असे नमूद केले आहे. या निर्णयातून जमा होणारी रक्कम सुमारे ६७ लाख रुपये असेल, अशी माहिती महापालिकेचे मुख्य वित्त व लेखाधिकारी संतोष वाहुळे यांनी दिली.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions