अॅट्रॉसिटीचा गुन्हा मागे न घेतल्याने खून; आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): दाखल
केलेला अॅट्रॉसिटीचा गुन्हा मागे न घेतल्याच्या रागातून कट रचून खून करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. आर. उबाळे यांनी २६ मे २०२६ रोजी हा निकाल दिला. शिवाजी महादु उर्फ माधवराव औताडे असे शिक्षा झालेल्या आरोपीचे - नाव आहे.
ही घटना १८ ऑगस्ट
२०२२ रोजी चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिसादेवी शिवारात घडली होती. मृत व्यक्तीने आरोपींविरोधात यापूर्वी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपींकडून दबाव आणला जात होता, तसेच जातीवाचक शिवीगाळही केली जात होती. मात्र, मृताने गुन्हा मागे घेण्यास नकार दिल्याने आरोपीने पूर्वनियोजित कट रचून कुऱ्हाडीने वार करत त्यांचा खून केला.
न्यायालयाने साक्षी-पुरावे
आणि दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी शिवाजी औताडे याला भादंवि कलम ३०२ अंतर्गत दोषी ठरवले. त्याला आजीवन कारावास आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, दंड न भरल्यास अतिरिक्त ६ महिन्यांची शिक्षा भोगावी लागेल. या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील राजेंद्र मुगदीया यांनी काम पाहिले, तर तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांनी केला होता.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions