वैजापूर तालुक्यातील भायगाव गंगा येथील तरुणाची हत्या

Foto
वैजापूर, (प्रतिनिधी) : जुन्या भांडणातून लोखंडी फावड्याने वार करून निर्गुण हत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

भायगावगंगा येथील रहिवाशी असलेले नवनाथ काशिनाथ वाणी वय ३२ वर्ष हे एका वाहनावर चालक म्हणून काम करतात त्यांचा चालक मित्र राहुल गोरख ठोकळ हा सुद्धा त्यांच्या सोबत चालक म्हणून कार्य करतो. काही दिवसापूर्वी राहुल व नवनाथ यांच्यामध्ये काही कारणास्तव वाद झाला होता.

जवळील नातेवाईक यांनी दोगांना समजावून सांगत वाद मिटवला देखील होता. परंतु १ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या दरम्यान नवनाथ हे त्यांच्या घरासमोर झाडा खाली उभे असताना आरोपी राहुल ठोकळ यांच्या घराजवळ येत त्यांच्याशी जुन्या भांडनाबाबत वाद घालून शिवीगाळ करू लागला. सोबत आणलेले लोखंडी फावड्याने मारहाण करण्यास सुरवात केली. त्याने नवनाथ वाणी यांच्या डोक्यात व छातीवर फावड्याने जोरदार वार केले. हे पाहून नवनाथ यांची आई काशाबाई वाणी व आते भाऊ गोपाळ कदम धावत आले. नवनाथ यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. नवनाथ हे खाली पडताच राहुल याने त्यांच्या छाती व मागील बाजूला २ वार केले. विना क्रमांकाच्या गाडीवरून पळ काढला. 

उपस्थित नातेवाईक यांनी रुग्णवाहीका यांना माहिती देत रुग्णवाहिका बोलावली डॉक्टरांनी नवनाथ यांना तपासून मृत घोषित केले. पुढील कार्यवाहीसाठी नवनाथ वाणी यांचा मृतदेह देवगाव रंगारी येथे रुग्णालय येथे नेण्यात आला. फिर्यादी गोपाळ कडू कदम यांच्या तक्रारी वरून आरोपी राहुल ठोकळ याच्या विरुद्ध शिवूर पोलिसांत खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास शिवूर पोलीस करत आहे.