न. प. स्थापनेच्या ७२ वर्षानंतर पहिल्यांदा जनतेतून महिला नगराध्यक्ष निवडणार

Foto
रमेश लिंबोरे
पैठण ;  नगर परिषदेच्या स्थापनेच्या ७२ वर्षानंतर पहिल्यांदाच महिला नगराध्यक्ष जनतेतून निवडण्यात येणार आहे. या पूर्वी पैठण नगर परिषद मध्ये ५ महिलांनी नगराध्यक्ष पद भूषवलेले आहेत.

त्या पैकी चार महिलांनी तर एका महिला महिला अधिकाऱ्याने प्रभारी अध्यक्षपद भूषवले आहे. नगर परिषदेच्या पहिल्या महिला नगराध्यक्ष होण्याचा बहुमान यमुनाबाई पवार यांनी मिळवलेला आहे.
१९९२ ते १९९७ पर्यंत महिला नगराध्यक्ष म्हणून सतत पाच वर्षे त्यांनी नगराध्यक्ष पद भूषवले आहे. या नंतर शोभा दिलीपराव सोनारे, राखी राजू परदेशी, प्रा. डॉ. रंजना पाटीदार यांनी निर्वाचित नगराध्यक्षपद भूषवले आहे तर वंदना गेवराईकर (तहसीलदार) यांनी प्रभारी नगराध्यक्षपद भूषवले आहे. या नंतर आता पहिल्यांदाच जनतेतून महिला नगराध्यक्ष निवडण्यात येणार आहे. 

नगर परिषदेच्या ७२ वर्षाच्या कालावधीत ४० जणांनी नगराध्यक्ष पद भूषवले आहे. नगर परिषदेचे पहिले नगराध्यक्ष म्हणून गोपाळराव चव्हाण यांनी बहुमान मिळवलेला आहे. तर सर्वाधिक कालावधी पर्यन्त व सर्वाधिक वेळा दिगंबरराव कावसानकर यांनी नगराध्यक्ष पदी राहण्याचा बहुमान मिळवलेला आहे. ते तीन वेळा नगराध्यक्ष राहिले त्या नंतर सोमनाथराव जोशी दोन वेळा, जितसिंग करकोटक दोन वेळा नगराध्यक्ष म्हणून राहीले आहेत.
--नगराध्यक्ष पदाचा कालावधी --
गोपाळराव चव्हाण यांनी १९५४ ते १९५८ पर्यंत, दिगंबरराव कावसानकर १९५८ ते १९६३, विठ्ठल शेठ लाड १९६१ ते १९६३, दिगंबरराव कावसानकर १९६३ ते १९६६, द. ह. देसाई हंगामी अध्यक्ष १६ जून ६६ ते २३ जून १९६६ नऊ दिवस. त्रिंबकदास पटेल २४ जून १९६६ ते ३१ जुलै १९६७, दिगंबरराव कावसानकर १ ऑगस्ट १९ २२ एप्रिल १९७४, मूफिदुर रहेमान खान मुख्याधिकारी (हंगामी अध्यक्ष) २३ एप्रिल १९७४ ते १२ जून १९७४, पी. के. मुंढे तहसीलदार पाहिले (प्रशासक) १६ जून ६७ ते १९७४ ते २८ ऑगस्ट १९७४, श्रीनिवास गो. फडणीस तहसीलदार (प्रशासक) २९ ऑगस्ट १९७४ ते १६ नोहेंबर १९७४, सोमनाथराव जोशी १७ नोव्हेंबर १९७४ ते ५ फेब्रुवारी १९८१, व्हि. के. दाभाडे नायब तहसीलदार (प्रशासक) 
६ फेब्रुवारी १९८१ ते ८ फेब्रुवारी १९८१, व्हि. ए. खारकर (प्रशासक) मुख्याधिकारी ९ फेब्रुवारी १९८१ ते २९ मे १९८१, अ. ल. जोशी तहसीलदार (प्रशासक) ३० मे १९८१ ते २५ मे १९८२, व्ही. के. दाभाडे नायब तहसीलदार (प्रशासक) २६ मे १९८२ ते ३जून १९८२, एम. एच. धारवाडकर तहसीलदार (प्रशासक) ४ जून १९८२ ते ८ जून ८३, जी. के. वैद्य तहसीलदार (प्रशासक) ९ जून १९८३ ते ८ एप्रिल १९८४, आनंद कुलकर्णी तहसीलदार (प्रशासक) ६ मे १९८४ ते १४ मे १९८४, जी. के वैद्य (प्रशासक) तहसीलदार १५ मे १९८४ ते १८ जानेवारी १९८५, पी. टी. चव्हाण (प्रशासक) तहसीलदार १९ जानेवारी १९८५ ते १४ मे १९८५, अनिल पटेल १५ मे १९८५ ते १६ डिसेंबर १९९१ नवनिर्वाचित, सोमनाथराव जोशी १७ डिसेंबर१९९१ ते १५ जुलै १९९२, नवनिर्वाचित, यमुनाबाई पवार ३१ जुलै १९९२ ते १६ डिसेंबर १९९७ नवनिर्वाचित,  शोभा दिलीपराव सोनारे १७ डिसेंबर १९९६ ते १८ डिसेंबर १९९७, राखी राजू परदेशी १७ डिसेंबर १९९७ते १६ डिसेंबर १९९८, प्रा. डॉ. रंजना महेंद्र पाटीदार १७ डिसेंबर १९९८ ते १० डिसेंबर १९९९, राम मिराशे तहसीलदार (प्रशासक) १६ डिसेंबर १९९९ते ३१ डिसेंबर १९९९, सोमनाथ प्रताप सिंग टाक १ जानेवारी २००० ते १६ डिसेंबर २००१, चंद्रशेखर लक्ष्मीकांत पाटील जनतेतून नगराध्यक्ष १७ डिसेंबर २००१ ते १६ डिसेंबर २००६, माधव
निलावाड तहसीलदार (हंगामी अध्यक्ष) 
१७ डिसेंबर २००६ ते १९ डिसेंबर २००६, अनिल चंद्रकांत घोडके १९ डिसेंबर २००६ते ७ जुलै २००८, केशव व्यंकटराव नेटके (तहसीलदार) हंगामी अध्यक्ष ८ जुलै २००८ ते २७ जुलै २००८, जीतसिंग दीपक सिंग करकोटक २८, जुलै २००८ ते १८ जून २००९, सोमनाथ कचरू सिंग परदेशी १९ जून २००९ ते १ सप्टेंबर २०१०, वंदना गेवराईकर तहसीलदार प्रभारी अध्यक्ष २ ऑक्टोंबर २०१० ते ६ ऑक्टोंबर २०१०, जीतसिंग करकोटक ७ ऑक्टोबर २०१० ते १६ डिसेंबर २०१२, राजू शिंदे तहसीलदार (प्रभारी अध्यक्ष) १७ डिसेंबर २०११ते २८ डिसेंबर २०११, राजू गायकवाड २९ डिसेंबर २०११ ते २०१४, दत्ता गोर्डे २०१४, ते २०१६, सुरज लोळगे डिसेंबर २०१६ ते जानेवारी २०२२ अशाप्रकारे नगरपरिषदेच्या ७२ वर्षाच्या स्थापनेच्या कालावधीत ४० नगराध्यक्ष होऊन गेले आहेत. २०२२ नंतर प्रशासक राज्य सुरू आहे. आता पहिल्यांदा जनतेतून महिला नगराध्यक्ष निवडण्यात येणार आहे.