औरंगाबाद : महापालिका निवडणुकीसाठी एकी कडे राष्ट्रवादीच्या कांग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी कंबर कसली असतांना मात्र स्थानिक नेत्यांचे आपसातील वाद कायम आहे.प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटलांनी काल औरंगाबादेत पालिका निवडणुकीसाठी आढावा घेतला. राष्ट्रवादी भवनात झालेल्या मेळाव्यात पक्षाचे शहर ग्रामीण नेत्यांनीही उपास्थित राहत आपण पक्षाचे किती एकनिष्ठ आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न केला.मात्र दुसरी कडे नेते गेल्या नंतर एक दुसर्याचे चेहरे न पाहणार्यांनी आपसातील वाद कायम असल्याचे दाखवून दिलं. त्यामुळे पक्षाध्यक्ष जयंत पाटील ही हे चित्र बघून अवाक झाले.
आपला नेता भाषण देण्यास सुरवात करतो न करतो त्यां पाठिराख्यांची जोरदार घोषणाबाजी सुरु होती. मेळाव्यात स्थानिकते.प्रत्यक्षात शहरात राष्ट्रवादीला दमदार नेतृत्व नसल्याने गेल्या पालिका निवडणुकीत फक्त चार जागा जिंकता आल्या.ग्रामीण भागातील नेते शहरातील पदाधिकार्यांना जवळ करत नाही. शहरातील मध्य विधानसभा राष्ट्रवादीला कडे आहे.मात्र दमदार नेतृत्वाची कमतरता तसेच मुस्लिम उमेदवार असल्याने मराठा नेते पाठ फिरवतात.हे नेहमीचे चित्र आहे.पक्ष म्हणून कोणी का करत नाही. उमेदवाराची जात व तो कोणत्या गटाचा याचा विचार करूनच काम केले जाते. गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारलेल्या नेत्यांनी या कार्यक्रमाचा उपयोग करत मनातील सल काढली. औरंगाबाद मध्यमधून पराभूत उमेदवार कादिर मौलाना यांनी पक्षातील अंतर्गत लाथाडयामुळे पक्षाचे कसं नुकसान झाले याचा पूर्ण पाढाच वाचला. जिल्ह्यात पक्षाने पाच जागेवर उमेदवार दिलं मात्र एकही उमेदवाराला यश मिळाले नाही.नेहमी प्रमाणे पक्षातील दिग्गज नेत्यांनी आपला माणूस कोण? हे पाहून काम केले. मोठे नेते आल्या नंतर मागे-पुढे फिरत आपण उमेदवाराचे इमानेइतबारे काम करत असल्याचे दाखविण्याचे प्रयत्न केलं. प्रत्यक्षात तसं काहीच झाले नाही. हे निकालावरून जाहीर झाले.मौलाना यांनी ज्यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाशी गद्दारी केली त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली. त्यावर जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांनी सारवासारव करत मागचे काय झाले त्यावर चर्चा न करता पालिका निवडणुकीत मतभेद विसरून कामाला लागण्याचे आवाहन केले. जयंत पाटलांनी हीं कैलास पाटलांची री ओढत औरंगाबाद महापालिका निवडणूक पक्षा साठी महत्वाची आहे. महाविका आघाडी बरोबर सत्तेत सहभागा साठी जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणणे गरजेचे आहे. आघाडी करतांना जागा मर्यादित मिळणार आहे. त्यामुळे कोणाला तिकीट मिळाले नाही तर पक्षाचे एकनिष्ठ म्हणून काम करावे. आता जयंत पाटलांनी इच्छूकांना पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचे आवाहन केले असले तरी त्याचा कितपत परिणाम होतो हे पाहणे मजेशीर राहणार आहे.