राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची नियोजन बैठक

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : सरसकट शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या एल्गार अन्नदात्याचा मोर्चाच्या अनुषंगाने तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नियोजन बैठक शासकीय : विश्रामगृह, सिल्लोड येथे झाली. 

या बैठकीस जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील व सुधाकर दानवे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी तालुक्यातील  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकरी हिताच्या या लढ्यासाठी सोमवारी (दि. २९) जून रोजी होणाऱ्या एल्गार अन्नदात्याचा मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा संकल्प करण्यात आला. अन्नदात्याच्या न्याय हक्कासाठी संघर्ष शेतकरी कर्जमाफीसाठी निर्धार या वेळी बैठकीत करण्यात आला.