बिहारमध्ये एनडीएला सर्वाधिक मते, 180 जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?

Foto
पटणा - बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू आहे. याठिकाणी सुरुवातीच्या कलांपासून भाजपा-जेडीयू एनडीएला आघाडी मिळताना दिसत आहे. त्यात एनडीएने 122 जागांचा बहुमतांचा आकडा ओलांडून 180 जागांपर्यंत मुसंडी मारली आहे तर विरोधी आरजेडी काँग्रेस आघाडीला मोठा फटका बसल्याचे दिसून येते. बिहारमध्ये आरजेडी 24 जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र आहे.

बिहारमध्ये दुपारपर्यंतचे चित्र

भाजपा - 96
जेडीयू - 84
आरजेडी - 24
एलजेपी - 19
काँग्रेस - 2
एमआयएम - 5 

बिहारमध्ये एनडीएचे सरकार पुन्हा सत्तेत येणार हे स्पष्ट दिसून येत आहे. मात्र मतांची टक्केवारी पाहिली तर बिहारमध्ये सर्वाधिक मते तेजस्वी यादव यांच्या आरजेडीला पडल्याचे दिसून येते. बिहारमध्ये आतापर्यंत 24 लाख 37 हजार मते आरजेडीला मिळाली आहेत. त्यापाठोपाठ भाजपाला 23 लाख 10 हजार मते, जेडीयूला 19 लाख 62 हजार मते मिळाली आहे. बिहारमध्ये सर्वाधिक मतांची टक्केवारी 23.02 टक्के आरजेडीला, भाजपाला 21.82 टक्के तर जेडीयूला 18.53 टक्के मते मिळाली आहेत. बिहारमध्ये मतमोजणी सुरू असल्याने या आकडेवारीत आणखी बदल होण्याची शक्यता आहे.
 
नितीशकुमारच मुख्यमंत्री
 
दरम्यान बिहारच्या निकालात महाराष्ट्र पॅटर्न दिसण्याची शक्यता वर्तविली जात असताना निकलाआधीच भाजपने मोठी घोषणा केली आहे. नितीश कुमारचे बिहारचे मुख्यमंत्री होणार अशी घोषणा भाजपचे केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह यांनी केली आहे.