नागघाटावर पैठणकरांनी नागपंचमी केली साजरी

Foto
पैठण, (प्रतिनिधी) : दक्षिण काशीतील श्रीक्षेत्र जुन्या पैठण मधील शालिवाहन नगरीतील ऐतिहासिक नाग घाटावर श्रावण शुद्ध पंचमी शुभ पर्वावर श्रावणी सोमवारी भक्तिमय वातावरणात नागपंचमी उत्सव साजरा करण्यात आला.

या सोहळ्यानिमित्ताने नाग घाटावर छोटी यात्रा भरली होती. भल्या पहाटे नागेश्वर नागदेवता दगडी मूर्तीचा अभिषेक सचिन जाधव व कांता वरकड यांच्या हस्ते पुरोहित जितेंद्र कुलकर्णी व योगेश कस्तुरे यांच्या मंत्रउच्चारात झाला. दिवसभरात अनेकांनी नागेश्वर नागदेवतांचे अभिषेक केली यावेळी सतीश सराफ, सतीश मुळे, दिलीप रावस, पंढरीनाथ फुलझळके, बालप्रसाद साबू, दिलीप रावस, दिनेश पारीख, बबलू रावस, प्रसाद खिस्ती, संतोष हिंगे आदी
कार्यकर्ते उपस्थित होते.

श्रावण महिन्यातील सोमवारी नागपंचमी आल्यामुळे भक्त गणात अति आनंदाचे वातावरण पाहाव्यास मिळाले. नाग घाटावरील प्राचीन घटनेचा तथा ऐतिहासिक घटनेचा इतिहास जतन करण्यात आलेला आहे. राज्य सरकारने नागघाटाला राष्ट्रीय स्मारक जाहीर करून नागघाटाचा विकास करावा अशी मागणी नागघाट भक्तमंडळाने केली आहे. रूढी, परंपरा, चालीरीतीप्रमाणे या ही वर्षी भक्तांची नागघाटावर गर्दी उसळली होती. पैठणकरांनी घरा घरात भक्ती गीते म्हणून नागाच्या फोटोचा आणि मूर्तीची पूजा केली. 

पैठण तालुक्यातील वाहेगाव, वडवळी, टाकळीअंबड येथेही नागपंचमी थाटामाटात उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली.