म्हणणे मांडण्यासाठी निवडणूक विभागाकडून नोटिसा बजावण्यास सुरुवात
नावे नसलेल्या मतदारांनी काय करावे ?
त्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो): जिल्ह्यातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणात (एसआयआर) तब्बल ३ लाख ६१ हजार २८१ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. या मतदारांना आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यासाठी निवडणूक विभागाने नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत १० हजार ६८० मतदारांना
एसआयआरचे काम सुरू होण्यापूर्वी मतदारांचे मॅपिंग करण्यात आले. त्यात ६ लाख १२ हजार ३२२ मतदारांपैकी सुमारे ५ लाख मतदारांची नावे जुळलेली नाहीत. मतदार यादीमध्ये नाव आहे, परंतु २००२ च्या मतदार यादीनुसार मॅचिंगमध्ये नावे सापडले नाहीत अशा मतदारांना २४ ऑक्टोबरपर्यंत ओळखपत्र, पेन्शन, कर्मचारी शासकीय, निमशासकीय, बँक, पोस्ट, एलआयसी, पीएसयू, जन्माचा दाखला, दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र, कायम रहिवासी पता पुरावा, पासपोर्ट, वनहक्क प्रमाणपत्र, ओबीसी, एससी, एसटी जातप्रमाणपत्र पुरावा, राष्ट्रीयत्वाचा पुरावा, जागा, घर मिळाल्याचा शासकीय पुरावा, आधार कार्ड यापैकी १२ पैकी एक पुरावा सादर करावा लागेल.
नोटिसा देण्यात आल्या असून ३ लाख ४६ हजार २०९ मतदारांना नोटिसा देणे अद्याप बाकी आहे. दरम्यान, आणखी ४ हजार ३८७ नोटिसा जनरेट करण्याचे काम सुरू असल्याने एसआयआर प्रक्रियेत वगळण्यात आलेल्या मतदारांच्या संख्येने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे
केले आहे.
जिल्ह्यातील मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण काम १७ ऑगस्टला संपले. ६ लाख १२ हजार ३९२ मतदारांची नावे यादीतून वगळण्याचा निर्णय झाला. त्यात २ लाख ५१ हजार १११ मतदार स्थलांतरित, मृत, दुबारनावे,
गैरहजर, पत्ता अपूर्ण असलेले होते. ते मतदार वगळून ३ लाख ६१ हजार २८१ मतदारांना नोटिस देणे सुरू आहे. मतदार यादीत नाव नसलेल्या नागरिकांनी सुनावणीनंतर १२ पैकी १ किंवा दोन पुराव्यानिशी फॉर्म क्र. ६ भरून बीएलओंकडे सादर करावा.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions














