नांदूर - मधमेश्वर जलदगती मुख्य कालव्यातून आवर्तन सोडले

Foto
वैजापूर, (प्रतिनिधी) : मराठवाड्यातील वैजापूर, गंगापूरसह अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्याला सिंचनासाठी पिण्याच्या पाण्यासाठी अतिशय उपयुक्त असलेल्या नांदूर मधमेश्वर जलदगती मुख्य कालव्यातून रब्बी हंगाम २०२६ २७ साठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. 

हे आवर्तन तीन आठवडे सुरू राहणार आहे, अशी माहिती नांदूर मधमेश्वर कालवा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नवीण पाबळे यांनी दिली. नियोजित नाणी पातळीनुसार शुक्रवारी रात्री ३०० क्युसेकने पाणी सोडण्यात जलदगती कालव्यातून पाणी सोडले आले. साडेआठशे क्युसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. रविवारी सकाळी कालव्याचे पाणी वैजापूर तालुक्याच्या हद्दीत दाखल होणार आहे.

दरम्यान, तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी सातत्याने केली जात होती. यासाठी शेतकरी व शेतकरी संघटनांनी नांदूर मधमेश्वर कालवा कार्यालयासमोर उपोषण तसेच महिलांनी लक्षणीय सहभाग नोंदवत येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने कालव्यातून पाणी केल्याने शेतकऱ्यांमध्ये सोडण्याचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणी लाभधारक आनंदाचे वातावरण आहे. 

पायथा ते माथा या नियमानुसार आधी गंगापूर तालुक्यातील गावांना लघुवितरिकांद्वारे पाणी सोडण्यात येणार आहे. त्यानंतर वैजापूर व गंगापूर तालुक्यांतील गावांना याचा फायदा मिळणार आहे. वैजापूर व गंगापूर तालुक्यांतील ४४ गावांना कालव्याच्या पाण्याचा रब्बी हंगामासाठी लाभ मिळणार आहे. 

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कालव्याच्या लाभक्षेत्रात प्रतिबंधक आदेश लागू करण्यात आले आहेत. लाभक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना मंजूर पाणीपाळीनुसार समन्यायी पद्धतीने पाणी उपलब्ध व्हावे यासाठी हे आदेश लागू करण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.