उद्या नारायणाची अ‍ॅडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : विद्यार्थी पुढील भविष्याच्या वाटचालीसाठी सज्ज झालेले आहेत. याच दृष्टीने राष्ट्रीय स्तरावर कार्यरत नारायणा आयआयटी नीट फाऊंडेशन अकॅडमीतर्फे रविवारी (दि.२९) सकाळी ११:३० ते दुपारी १ वाजेदरम्यान अभियांत्रिकी व वैद्यकीयच्या प्रवेशपूर्व परीक्षेच्या तयारीच्या दोन वर्षीय अभ्यासक्रमासाठी अ‍ॅडमिशन कम स्कॉलरशिप टेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. सोबतच इयत्ता ७ वी, ८ वी, ९ वीतील विद्यार्थ्यांकरिता फाउंडेशन कोर्स बॅच अ‍ॅडमिशन कम स्कॉलरशिप टेस्टसुद्धा होईल. 
परीक्षा नारायणा इन्स्टिट्यूटच्या मंजितनगर शाखा आकाशवाणी, सिग्नल जालना रोड येथे घेण्यात येणार आहे. विज्ञान व गणित यावर आधारित वस्तूनिष्ट पद्धतीच्या या परीक्षेसाठी मराठवाडा, विदर्भ, खान्देश येथून हजारो विद्यार्थी उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्थेतर्फे देण्यात आली. परीक्षेसाठी नोंदणी आवश्यक आहे आणि ऑन स्पॉट नोंदणीची सुविधाही उपलब्ध राहील. परीक्षेनंतर विद्यार्थी व पालकांसाठी मार्गदर्शन शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. यावेळी संस्थेचे संचालक डॉ. विशाल लदनिया व सर्व प्राध्यापकवृंद उपस्थित राहणार आहेत. दुपारी १ वाजता सेमिनार इन्स्टिट्यूट परिसराजवळ असलेल्या साई मंदिर प्रांगणात होईल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी ९३७२२३३९३६/३७/३८ या नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.